ShivSena 
महाराष्ट्र बातम्या

ShivSena: मुलीचं नाव 'शिवसेना'; कट्टर शिवसैनिकानं बाळासाहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

शिवसेनेची पाळमुळं किती खोलवर रुजली आहेत हेच यावरुन स्पष्ट होतं.

सकाळ डिजिटल टीम

महाड : पक्षफुटीमुळं गेल्या काही महिन्यांपासून 'शिवसेना' हा पक्ष चर्चेत आहे. पण आता एका वेगळ्याच कारणासाठी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या एका कट्टर शिवसैनिकानं आपल्या मुलीचं नावच 'शिवसेना' ठेवलं आहे. याद्वारे त्यानं बाळासाहेबांप्रती एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे. (Pandurang Wadkar expressed his gratitude to Balasaheb Thackeray with ShivSena as his baby girl name)

राजयगड जिल्ह्यातील महाड येथील पांडुरंग वाडकर यांनी आपल्या लेकीचं नाव 'शिवसेना' असं ठेवलं आहे. वाडकर हे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यामुळंच आपल्या पक्षाचं नाव कायमच आपल्या तोंडी असावं तसेच समोर असावं यासाठी त्यांनी ही भूमिक घेतली. पण 'शिवसेना' हे नाव आपल्या मनामध्ये का आलं हे सांगताना पांडुरंग वाडकर म्हणतात, "माझी मुलगी जन्माला यायच्या आदल्या रात्री स्वतः बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला हे नाव सुचवलं. त्याअनुषंगानं मी माझ्या मुलीचं नाव 'शिवसेना' असं ठेवलं" पांडुरंग वाडकर हे उपसरपंच राहिले आहेत.

दरम्यान, या नामकरणविधी सोहळ्याला आलेले कार्यकर्ते आणि पाहुण्यांनी देखील मुलीच्या या नावाचं स्वागत केलं आहे. तसेच महाराष्ट्रात अशी पहिलीच घटना असेल की कोणी आपल्या मुलीचं नाव 'शिवसेना' ठेवलं असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

शिवसेना म्हणजे गोरगरिबांना मदत करणं, मराठी माणसाला न्याय देणं, महाराष्ट्राचा दर्जा उंचावणं अशा प्रकारचं काम म्हणजे शिवसेना. शिवसेनेला आज जो नावलौकिक मिळतोय तो बाळासाहेब ठाकरेंमुळं त्यामुळं या मुलीलाही असाच नावलौकिक मिळावा, या सदिच्छा देण्यासाठीच आपण इथं जमलोय असं एका पाहुण्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं. शिवसेनेची पाळमुळं किती खोलवर रुजली आहेत हेच यावरुन स्पष्ट होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT