Pankaja Munde Dasara Melava Speech Devendra Fadnavis bjp maharashtra politics crisis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

सकाळ डिजिटल टीम

“जरुरत से जादा इमानदार हू मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हु”. मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही. असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. तसेच त्यांनी मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. असे सूचक वक्तव्यही मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुंळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ( Pankaja Munde Dasara Melava Speech Devendra Fadnavis bjp maharashtra politics crisis )

पंकजा मुंडे यांचा बीड येथे दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावातील भक्तीगडावरून त्या जनतेशी संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी राजकीय फटकारेही लगावले.

यावेळी बोलताना त्यांनी नाराजीच्या चर्चेवर मौन सोडले. “जरुरत से जादा इमानदार हू मैं, इसलिए सबके नजरों में गुनहगार हु”. मला आता पक्षाला त्रास द्यायचा नाही. कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचं नाही. आपण आपलं शांत राहायचं. मी दुर्गेचं रुप धारण करावं असं तुम्हाला वाटतं, ते मी करेन. असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी जनतेला दिले.

तसेच, मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी नाराजीचा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे. अस सूचक वक्तव्यही मुंडे यांनी केलं आहे.

माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. असे सांगत त्यांनी नाराजीच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Sddique Shot Dead: 'तो' प्रकल्प ठरला कारणीभूत? बाबा सिद्दीकींना का संपवलं? हरियाना कनेक्शन समोर...

Success Story: स्पर्धा परीक्षेमध्ये हिरमोड; शेतीत वरचढ! तरुणाने सिमला मिरचीतून 4 महिन्यात घेतले 10 लाखांचे उत्पन्न

Baba Siddique Last Social Media Post: बाबा सिद्दीकी सोशल मीडियावर शेवटचे काय म्हणाले होते? काय होती शेवटची पोस्ट?

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ ठेवायचा असेल तर 'या' योगासनांचा नियमितपणे करावा सराव

Latest Maharashtra News Updates LIVE: बाबा सिद्दीकींची हत्या करणारे ते दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत

SCROLL FOR NEXT