pankaja munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: "देव न करो, ती वेळ येवो"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

गोपिनाथ मुंडेंपेक्षा आपल्यावर अधिक संघर्षाची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : गोपिनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नये. ईश्वर न करो आयुष्यात मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो, असा निर्णय घेणं हे खुपच दुःखदायक असतं, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली, पार्श्वभूमीवर त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना हे विधान केलं आहे. (Pankaja Munde expressed grief about her Political career in BJP)

अफवा उठवू नये

माझ्याविरोधात अफवा उठवू नये, मला जेव्हा आयुष्यात काहीपण निर्णय घ्यायचा असेल तर इश्वर करो ती वेळ येऊ नये. विवाहबंधनासारखं संघटनेशी आपलं बंधन असतं. नकळत आपण एका आयडॉलॉजीवर प्रेम केलेलं असतं. त्यामुळं असा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घ्यावा लागणं हे दुखःदायक असतं. असा निर्णय कोणालाही घ्यायची वेळ येऊच नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

शहांनी अद्याप वेळ दिलेली नाही

दरम्यान, अमित शहा यांना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवायची आहे पण त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. पंकजा म्हणाल्या, अमित शहा जेव्हा वेळ देतील तेव्हा त्यांना मी भेटेन आता तर सत्तेत आणखी एक पार्टनर आहे, त्यामुळं राजकीय गणितं बदलली आहेत. (Latest Marathi News)

ती कारवाईच, बावनकुळेंना माहिती नाही

कोणत्याही सहकारी कारखान्याला नोटीस पाठवली असेल तर त्याला उत्तर देता येतं. नोटीस पाठवणं हे तपास यंत्रणांचं काम आहे त्याला उत्तर दिलं की, नोटीसा रद्द होतात. जर ऑडिटमध्ये काही गडबड झाली असेल तर पंकजा मुंडे त्याला उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती.

पण त्यांच्या या मताशी पंकजा मुंडे सहमत नसल्याचं दिसून आलं आहे. कारण "ही नोटीस नाही कारवाई आहे, त्यांना मी काय बोलू, त्यांना याची योग्य माहिती नाही," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT