Pankaja Munde OBC esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: EWSची वैधता आणि सत्तारांची शिवीगाळ; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

संतोष कानडे

मुंबईः सुप्रीम कोर्टाने ईडब्ल्यूएस आरक्षण वैध ठरवल्यानंतर माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पंकजा मुंडे ह्या ओबीसी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवाय अब्दुल सत्तार प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 10 टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. EWS कोट्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर प्रदीर्घ सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. कोर्टाने हे आरक्षण आज वैध ठरवलं. मुख्य न्यायमूर्तींसह दोन न्यायमूर्ती या निर्णयाच्या विरोधात होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामान्य वर्गातील नागरिकांना १० टक्के आरक्षण देणं योग्य आहे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने आरक्षण वैध ठरवलं. सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांपैकी तिघांनी आरक्षणाला समर्थन दिलं.

यासंबंधी भाजपच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलतांना सांगितलं की, आर्थिक क्षमतेमुळे अनेकांना संधी मिळत नाही. त्यासाठी हे ईडब्ल्यूएस आरक्षण गरजेचं आहे. पिढ्या घडण्यासाठी या मोठ्या निर्णयाचं योगदान ठरेल. हे आरक्षण सामाजिक आरक्षणाला धक्का न लावता दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानते, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. त्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. त्यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांविषयी आदरयुक्त बोललं पाहिजे. टीका करतांनादेखील मर्यादा सांभाळल्या पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT