Pankaja Munde Viral Audio Clip
Pankaja Munde Viral Audio Clip Esakal
महाराष्ट्र

Pankaja Munde: पंकजा मुंडेंबद्दलच्या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला अटक

आशुतोष मसगौंडे

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बीडमध्ये मुंडे समर्थक संतापले होते.

आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला बीड गुन्हे शाखेने अटक केली आहे. बीड-अहमदनगर मार्गावरील जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा ताबा आता बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बीडमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर खांडे यांच्यावर बीड आणि परळीत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

असे असले तरी खांडे यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आणि या गुन्ह्यामध्ये खांडे यांना आता अटक करण्यात आली आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत बंजरंग सोनावणे यांचे काम करत पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे, तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याबाबत वक्तव्य केले होते.

या सर्व प्रकरणानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे नेते वाल्मिक कराड यांनी परळी पोलिसांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आणि शिवराज बांगर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान खांडे यांच्या शोधासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती. कुंडलिक खांडे हे जामखेडमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाजूने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे असूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Gayatri Mantra: निता अंबानींच्या लाल साडीवर सोनेरी रंगात लिहिलेल्या गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे

Maharashtra Live News Updates : पंतप्रधान असोत किंवा सभागृहाचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन खरगेंचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी- शरद पवार

Namrata Sambherao : हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने बांधलं नवं घर ; फोटो शेअर करताना म्हणाली "विश्वास हा सगळ्या गोष्टी..."

SCROLL FOR NEXT