exzam exzam
महाराष्ट्र बातम्या

पुणे : आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बहुचर्चित आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाल्याच्या प्रकरणामध्ये अखेर शनिवारी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पेपर फुटीच्या घटनेमुळे भरती प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

याप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रविंद्र कारेगावकर (वय 51) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विर्निदीष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डि.एस.हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्‍टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. दुपारी दोन वाजता लेखी परीक्षा सुरु झाली.

मात्र त्यापुर्वीच काही व्यक्तींनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रश्‍नपत्रिकेतील 100 प्रश्‍नांपैकी तब्बल 92 प्रश्‍न व त्यांची लिखित स्वरुपात उत्तरे असलेला माहितीचा पेपर फोडून ती माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारीत केली होती. या प्रकाराद्वारे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही उमेदवारांनी या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. विविध पोलिस ठाण्यामध्ये फिरल्यानंतर 31 ऑक्‍टोबरला सायंकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर हा सर्व प्रकार सायबर पोलिसांशी संबंधीत असल्याने सायबर पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT