राज्यातील सत्तातरानंतर जिल्ह्याचे खासदार, आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. तर काहींनी शिंदे गट आणि भाजपला नेते मंत्री फोडाफोडीत फारस यश मिळालं नव्हतं. परंतु सत्तांतरानंतर अनेक नेते पदाधिकारी मात्र आता पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच महाविकास आघाडीतले घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला मात्र शिंदे गटाने मोठा दणका दिल्याचा दावा केला जात आहे.
परभणीतील तब्बल १०१ सरपंच, ३४ माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी काल रात्री हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. शिंदे गटाने राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसला दणका दिल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
परभणीतील शिवसेना युवानेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सर्वांना भगवा झेंडा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी, काँग्रेससह विविध पक्षातील १०१ ग्रामपंचायतीचे सरपंच , ३४ माजी नगरसेवक, शेकडो महिला- पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य जलील पटेल यांचा देखील समावेश आहे. परभणी जिल्ह्यातुन आतापर्यंत २०१ सरपंच, ६४ नगरसेवकानीं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. सईद खान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्ती असून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार बाबाजानी दुराणी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
बाजार समिती,नगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी व बाबाजानी दुराणी यांच्यासमोर शिंदेच्या शिवसेनेचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, मध्यंतरी सईद खान यांनी आमदार बाबाजाणी दुराणी हेच शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात माजी मंत्री व शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्यांशी त्यांचे फोनवरून बोलणे झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र दुराणी यांनी स्वतः खोतकरांना फोन करून खान यांना खोट्या अफवा पसरवण्यापासून रोखा, असे सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.