Wall Art  Sakal
महाराष्ट्र बातम्या

पालकांनो लक्षात ठेवा ‘ही’ चतुःसूत्री! तुमच्या चिमुकल्यांना लागेल शिक्षणाची गोडी; आता प्रत्येक शनिवारी भरतील दप्तराविना शाळा

तात्या लांडगे

सोलापूर : मुलांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांच्यात सुसंवाद असावा. अभ्यासाची गोडी निर्माण करताना चिमुकल्यांना छोटे दप्तर, पाटी-पेन्सिल देऊन सुरवातीला त्यांची आवड जोपासावी. त्यांना ऐकण्याची व एका जागी बसण्याची सवय लागावी म्हणून ध्यान, योगा जरुरी आहे. लिखाणासाठी बोटांची पकड मजबूत होण्यासाठी खोडरबरने खोडणे, मणी ओवणे, कात्रीने कागद कापणे, लहान वस्तू निवडणे अशा सवयी लावाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात.

लहान मुलांना गोष्टी सांगून, चित्रांमधून किंवा कधी हातवारे करून विषय सोपे करून सांगावेत. प्रश्नमंजूषा, गाणी म्हणून, ऐतिहासिक प्रसंग सांगून, नाट्यमय पद्धतीनेही त्यांना विषय समजावून सांगता येतील. त्यातून अभ्यास आणि मनोरंजन दोन्ही होईल. अभ्यासाची वेळ चिमुकल्यांना विचारून निश्चित करा. सकारात्मक संवादातून त्यांना अभ्यासाची गोडी लावावी. योगा, ध्यानधारणा अशांमधून चिमुकल्यांना एका जागेवर जास्तवेळ बसण्याची सवय लावता येईल. टीव्ही, मोबाइलचा वापर त्यावेळी नको, घरातील आवाज कमीच असायला हवा. जेणेकरून चिमुकल्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहील.

‘आनंददायी शनिवार’ची हवी प्रभावी अंमलबजावणी

शालेय शिक्षण विभागाने अभ्यासाचे ओझे वाटू नये, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणाऐवजी अनुभवातून, मनोरंजनातून शिक्षणाची गोडी लागावी, शाळा किंवा अभ्यासाबद्दल त्याला तिरस्कार वाटू नये म्हणून प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य राहणार आहे. त्यांच्या आवडीचे खेळ, कला प्रकार घेतले जाणार आहेत. पण, या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जरुरी असून हा उपक्रम पुस्तकी किंवा नावापुरताच मर्यादेत नको, अशीही पालकांची अपेक्षा आहे.

अभ्यासावेळी पालकांनी ‘या’ गोष्टी टाळाव्यात

  • 1) धमकी देऊन अभ्यास नको

  • पालकांनी एवढा अभ्यास केला तरच जेवायला देईन, बाहेर खेळायला सोडणार नाही, कोंडून ठेवेन, बोलणार नाही अशा धमक्या देवू नयेत. मुलांना अभ्यासाबद्दल गोडी निर्माण करताना अशा बाबींमुळे त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होवू शकतो.

  • ---------------------------------------------------

  • 2) अभ्यास करताना अमिष नको

  • अभ्यास केला तर चॉकलेट देईन, खेळायला सोडेन, आवडीचा पदार्थ करून देईन, असे अमिष देऊन अभ्यास करून घेऊ नका. काहीतरी मिळविण्यासाठी अभ्यास करायचा असतो अशी त्यांची मानसिकता होवू शकते.

---------------------------------------------------------------------------

  • 3) चिडू नका, मारू नका

  • अभ्यास करताना चूक झाल्यास त्याला वारंवार समजावून सांगा. सोप्या पद्धतीने तो विषय समजेल असे सांगा, पण त्यावेळी मारणे, रागावणे, अक्कल नाही, तुला काहीच येत नाही, तु कधी सुधारणार नाही, तुला समजतच नाही असे म्हणून हिनवू नका. त्यातून त्याचा आत्मविश्वास कमी होवू शकतो.

  • --------------------------------------------------------------------------

  • 4) तुलना करू नका

  • चिमुकल्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करताना शेजारील मुलासोबत किंवा मुलीसोबत त्याची तुलना करू नका. त्याचा मागील महिन्यातील अभ्यास व सध्याची प्रगती पाहून त्याचे कौतुक करा. त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितपणे अभ्यासाची गोडी निर्माण होऊन चिमुकला अभ्यासात पुढे जाईल.

गोष्टी सांगून, कृतीतून शिक्षण दिल्यास वाढेल गोडी

लहान मुलांना सुरवातीला व्यक्त व्हायला लावणे, कोणतीही गोष्ट अशी का आहे, त्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यात उत्सुकता निर्माण करावी. मानसन्मान, आदर करण्याच्या सवयी, कौशल्य विकसित करण्याकडे पालकांचे लक्ष असावे. गोष्टीतून त्याला अभ्यासाची गोडी निर्माण करता येईल.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदिक तज्ज्ञ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT