Parliament Monsoon Session 
महाराष्ट्र बातम्या

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अध्यक्षांना स्मरणपत्र

Sandip Kapde

Parliament Monsoon Session: उद्यापासून (गुरुवार) संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे. यापूर्वी अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा करण्यासाठी आज (बुधवार) सभागृहाच्या व्यवसाय सल्लागार समितीची (बीएसी) बैठक बोलावली आहे. लोकसभेच्या बीएसीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना या बैठकीत बोलावण्यात आले आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. संसदेत आम्हाला स्वतंत्र कार्यालय द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने यासंदर्भात पत्र दिले होते. आता पुन्हा एकादा लोकसभा अध्यक्षांना स्मरणपत्र दिले आहे.

2 फेब्रुवारीला ठाकरे गटाने पहिलं पत्र पाठवलं होत. त्यानंतर 26 जूनला पुन्हा पत्र पाठवलं आहे. लोकसभेत ठाकरे गटाचे 5 तर राज्यसभेत 3 खासदार आहेत. अध्यक्षांकडून पत्राला अजून कुठलंही उत्तर आले नाही.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असताना दुसरीकडे विरोधक मणिपूर हिंसाचार, रेल्वे सुरक्षा, महागाई आणि अदानीवरील जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीसह अन्य मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT