Parliament Security Breach 
महाराष्ट्र बातम्या

Parliament Security Breach: संसदेत गोंधळ घालणारा महाराष्ट्रातील तरुण कोण? लातूर जिल्ह्यातील झरी गावात पोलीस दाखल

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

लातूर: लोकसभेचे अधिवेशन सुरु असताना बुधवारी (ता. १३) काही तरुणांनी संसदेत जावून गोंधळ घातला. यातील एक तरुण हा लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आल्यानंतर येथील जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

एक पथकही या तरुणाच्या गावात पाठवण्यात आले आहे. हे पोलिसांचे पथक गावात जावून त्याच्या कुटुंबियाची चौकशी करीत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील हा तरुण असल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याने हे जे कृत्य केले आहे, या बाबत गावातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभेचे अधिवेशन सुरु असताना बुधवारी (ता. १३) काही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. त्यानंतर धुराच्या कांड्या फोडल्या. नही चलेगी नही चलेगी ताना शाही नही चलेगी अशा घोषणा या तरुणांनी दिल्या. या प्रकारामुळे संसदेत एकच गोंधळ उडाला. खासदारांचीही पळापळ झाली. तातडीने सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्य़ा या तरुण तरुणींना ताब्यात घेतले. यात अमोल धनराज शिंदे (वय २६) या तरुणाचा समावेश आहे. हा तरुण झरी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील रहिवाशी आहे.

पदवीपर्यंतचे त्याचे शिक्षण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो पोलीस भरतीचीही तयारी करीत आहे. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आई वडील, दोन भाऊ मजुरी करीत आहेत. अमोल देखील मिळेल ते काम करीत असे अशी गावकऱ्यात चर्चा आहे. काही दिवसापूर्वी तो येथून मुंबईला गेल्याची चर्चा गावात आहे. पण पुढे तो कोठे गेला, तो कोणाच्या संपर्कात आला, याची माहिती मात्र कोणालाच नाही. अचानक बुधवारी संसेदत हा प्रकार घडला.

टीव्हीवर अमोलचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियाला व ग्रामस्थांना देखील आश्चर्याचाच धक्का बसला आहे. आजच्या घटनेने संसदेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने याची गंभीर दखल केंद्र व राज्य शासनाने घेतल्याचे दिसत आहे. येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने फोन करुन माहिती घेतली जात आहे. त्यामुळे येथील जिल्हा पोलीस दल देखील सतर्क झाले आहे.

पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी तातडीने दीड दोन तास वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तपासाच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच चाकूर पोलिसांचे एक पथकही त्यांनी झरी गावात पाठवून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या पथकाने अमोलच्या कुटुंबीयाची चौकशीही सुरु केली आहे. या घटनेने सध्या तरी झरी गावाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या तपासात पुढे काय येते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (maharashtra latest news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT