Devendra Fadnavis-Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Patan Landslide : शरद पवारांची 'ती' सूचना योग्यच

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेली 'ती' सूचना योग्यच आहे. कारण, बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सूचना महत्वाचीच आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. आंबेघर (Patan Taluka Landslide) येथील बाधितांचे तात्पुरते स्थलांतर मोरगिरीतील मोरणा विद्यायात करण्यात आले आहे, त्यास फडणवीसांनी आज भेट देत पूरग्रस्तांची विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते. (Patan Taluka Landslide BJP Leader Devendra Fadnavis Visit Morgiri Village In Satara bam92)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेली 'ती' सूचना योग्यच आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

निसर्गानं सारं काही हिरावून घेतलं साहेब! लयं मोठं दुःख हाय काय करायचं, असे सांगून आंबेघरच्या भूस्खलनातील बाधितांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. यावेळी फडणवीस यांनी घाबरू नका. मला कल्पना आहे, दुःख खूपचं मोठं आहे. थोडा धीर धरा. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका, असा ठाम विश्वासही त्यांनी पूरग्रस्तांना दिला.

Devendra Fadnavis

गुरुवारी रात्रीपासून आक्रीत घडतंय. पाटण तालुका दरडींच्या भीतीखाली आहे. मिरगावसह पाच गावांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करून संकटांची मालिका बंद करावी. आधी धरणग्रस्त झालो, मग भूकंपग्रस्त झालो... आता भूस्खलनग्रस्त झालो आहे. ही मालिका कुठेतरी थांबली पाहिजे, अशी आर्त हाक मिरगाव, बाजे, ढोकावळे या परिसरातील भूस्खलनग्रस्तांनी केली. आंबेघर दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आंबेघर येथील पीडितांचं तात्पुरते स्थलांतर मोरगिरीतील मोरणा विद्यालयात करण्यात आले आहे. यावेळी फडणवीसांनी पूरग्रस्तांची विचारपूस केली, तसेच पूरग्रस्तांसोबत शाळेमध्ये जेवणही केले.

Devendra Fadnavis

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांनी कोयनेत संवाद साधला. त्याचदरम्यान पूर बाधितांनी शासन आम्हाला मदत देत आहे; परंतु त्यांना जागे करण्याची वेळ तुम्ही करा. सहा महिने ही मदत पुरेल त्यानंतर आमचं काय? पाच गावं आहेत की त्यांचा रस्ता वाहून गेलाय. तिसरी वेळ आहे पुनर्वसनाची. अजून किती वेळा हालअपेष्टा सहन करायच्या? १९६० ला धरणग्रस्त झालो. त्यानंतर भूकंप झाला आणि आता अतिवृष्टी झाली. आमचं नेमकं काय होणार आहे. ८० लोक हायस्कूलमध्ये आहेत. पुनर्वसन दोन चार दिवसांत होणार नाही. मदत आम्हाला मिळत आहे. मिळालेली मदत ठेवायची कुठे? तात्पुरते निवाऱ्याची सोय करा. कोयना क्वार्टर्स आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी त्यांनी केली. बाजे येथील रहिवाशांनी डोंगर कोसळल्याने रस्ता नाही, पाणी नाही, आमचं स्थलांतर करा अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

Patan Taluka Landslide BJP Leader Devendra Fadnavis Visit Morgiri Village In Satara bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT