शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आली आहे. या बंडामागे भाजपचा हात असल्याचे संजय राऊत स्पष्टपणे सांगत आहे. मात्र, या बंडामागे भाजप असल्याचे अजून दिसत झाले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांनी राज्यातील परिस्थिती पाहून वक्तव्य केले. त्यांना गुजरात आणि आसाममधील राजकीय परिस्थिती माहिती नसेल, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली. (Pawar believes the majority will be proved when the rebel MLA returns)
अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. राज्यातील सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करीत राहू असेही म्हणाले होते. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप असल्याचे अजून तरी दिसून येत नाही असे देखील स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार बंडखोर आमदार परत आल्यावर बहुमत सिद्ध करेल. आसाममध्ये गेलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. शिवसेनेचे व अपक्ष आमदार ज्या पद्धतीने गेले ते चुकीचे आहेत. माध्यमांसमोरून आलेल्या काही गोष्टी नाकारणे चुकीचे आहे. बहुमत आहे की नाही हे विधानसभेत सिद्ध होईल, असेही शरद पवार म्हणाले.
कोणता राष्ट्रीय पक्ष शिंदे यांच्यासोबत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. बंडखोर आमदारांना राज्यपालांकडे किंवा विधानसभेत तरी यावे लागेल. इथे आल्यावर त्यांना भाजप मार्गदर्शन करेल असे वाटत नाही. बंडखोर आमदारांना याचे परिणाम भोगावे लागतील. मुंबईत परत आल्यावर त्यांना मतदारसंघात लोकांना तोंड द्यावे लागेल, असेही शरद पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.