ST Bus Corporation esakal
महाराष्ट्र बातम्या

Digital Payment : ST प्रवाशांसाठी खुशखबर! आता रोख पैशांविनाही करता येणार एसटीतून प्रवास; महामंडळानं आणली 'ही' खास प्रणाली

सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

हेमंत पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे.

कऱ्हाड : एसटीचा (ST Bus) प्रवास करताना आता खिशात रोख पैसेच पाहिजेत, असे राहिलेले नाही. आता खिशात अथवा पर्समध्ये रोख रक्कम नसली, तरी चिंता करायचे कारण नाही. कारण, बदलत्या काळासोबत पावले टाकत एसटी महामंडळानेही प्रवाशांना तिकीट देण्यासाठी नवीन अॅड्राँईड मशिन (Android Machine) आणली आहेत.

त्याअंतर्गत राज्यात (ST Corporation) तब्बल ३४ हजार वाहकांना नवीन अॅड्राँईड तिकीट इशू मशिन येत्या महिनाअखेरपर्यंत देण्यात येतील. त्यामध्ये एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड वापरून एसटी तिकिटाचे पैसे देण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांची सोय होणार आहे.

सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल व्यवहाराला चालना देण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. मोबाईलवरून डिजिटल पेमेंट करणे सोपे असल्याने आता रोख व्यवहार कमी झाले आहेत.

डिजिटल पेमेंटमध्ये खिशात पैसे नसताना कुठेही खरेदी करता येते, त्याचबरोबर हॉटेलमध्ये व अन्य ठिकाणीही त्याचा वापर होतो, त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे. एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना तसेच वाहकांनाही सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होते.

अशावेळी वाहकाबरोबर वादावादी, सुट्या पैशांसाठी तिकिटावर लिहून देऊन पुन्हा पैसे घेणे, एसटीतून खाली उतरताना तिघा-चौघात एकत्रित पैसे देणे यासह अन्य प्रकार घडत असतात. त्यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. बदलत्या काळानुसार एसटीची सेवाही बदलावी, या हेतूने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या संकल्पनेतून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

त्यानुसार आता एसटीमध्येही तिकिटाच्या पैशासाठी अॅड्राँईड मशिन देण्यात येणार आहेत. त्या मशिन मिळण्यासाठी एसटी महामंडळाने ईबिस्कॅश या कंपनीशी करार केला आहे. त्यांच्याकडून येत्या महिनाभरात तब्बल ३४ हजार वाहकांना नवीन अॅड्राँईड आधारित डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन्स देण्यात येईल.

त्या मशिनद्वारे आता प्रवासादरम्यान खिशात पैसे नसतानाही प्रवाशांना डिजिटल पेमेंट करून प्रवास करता येणार आहे. राज्यभरातील सर्व एसटी डेपोंतील वाहकांना मशिन देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या नवीन मशिनमध्ये एटीएम, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे, यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून एसटीच्या तिकिटाचे पैसे ऑनलाइन देता येतील, त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

अशा मिळतील जिल्हानिहाय मशिन

एसटी महामंडळाकडे नवीन कंपनीच्या करारानुसार ३४ हजार वाहकांना नवीन अॅड्राँईड मशिन देण्यात येतील. त्यामध्ये साताऱ्यासाठी १७०२, सांगली १६७४, कोल्हापूर १७५२, सोलापूर २०५८, नांदेड १२९०, बीड ११७२, परभणी १०२४, पालघर १११३, रत्नागिरी २०२९, जळगाव १९८६, पुणे १७२०, वर्धा ५९९, रायगड ९५१, सिंधुदुर्ग ९५३, अमरावती १०५८, नाशिक २२२८, अहमदनगर १४३८, नागपूर १०८२, मुंबई २०२, ठाणे १६५२ इतक्या मशिन संबंधित एसटीच्या विभागांना देण्यात येतील.

आरक्षण प्रणालीही डिजिटल

एसटीच्या आरक्षण प्रणालीतही आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. एसटीचे अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल रिझर्व्हेशन ॲपचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवाशांना सहज आरक्षण करणे, त्यामुळे शक्य होणार आहे. येणाऱ्या काळात आरक्षण करत असताना पैसे कट झाले व तिकीट आले नाही, आरक्षण प्रणाली अचानक हॅंग झाली, अशा अडचणी भेडसावणार नाहीत. अशा पद्धतीने प्रवाशाभिमुख सुलभ आरक्षण प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

प्रवाशांच्या खिशात रोख पैसे नसले तरी डिजिटल पेमेंटद्वारे प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पुढाकार घेतला आहे. डिजिटल युगात एसटीची सेवा डिजिटल करण्यासाठी राज्यातील सर्व वाहकांना येत्या महिनाभरात नवीन अॅड्राँईड मशिन देण्यात येत आहेत.

- अभिजित भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT