10th, 12th exam
महाराष्ट्र बातम्या

गुणांची टक्केवारी म्हणजे आयुष्य नव्हे! पालकांनी मुलांवर लादू नयेत अपेक्षा; अपयश ही यशाची पहिली पायरी; शिक्षणात आता विद्यार्थ्यांना मोठ्या संधी

तात्या लांडगे

सोलापूर : समाजातील यशस्वी जीवनाच्या तथाकथित मापदंडात परीक्षेचे गुण किंवा टक्केवारी मोजली जाते. ही टक्केवारी गाठण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी जिवाचे रान करतो. जणू काही परीक्षा म्हणजे आमच्या स्पर्धात्मक जीवनातील प्रत्येक घडीला सामोरे जावे लागणारा अविभाज्य टप्पा त्यांना वाटतोय. त्यामुळे परीक्षांमधील संभाव्य अपयशाची भीती, निकालानंतर अनुत्तीर्ण झाल्याने काहीजण टोकाचा निर्णय घेतात. पण, परीक्षेतील गुणांची टक्केवारी म्हणजेच आयुष्य नव्हे, तर शिक्षणात अनेक संधी उपलब्ध असल्याने पुढे जाऊन देखील यशाच्या शिखरावर पोचता येते.

शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, आवाका, परीक्षा पद्धती व प्रत्यक्ष व्यावहारिक जीवन, यात सेतुबंध करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्य घडविण्यात मोलाची भूमिका बजावू शकते. विविध क्लासेस व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रश्नपत्रिकांचे स्वरूप माहीत झाल्यानंतर अधिकाधिक गुण प्राप्त करणे पूर्णत: तांत्रिक बनते. हा मंत्र व तंत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षांत मिळालेले गुण त्याचे त्या संबंधित विषयातील आकलन मानणे चुकीचे ठरेल. त्यामुळे काहीवेळा आधीच्या टप्प्यावर यशस्वी झालेला तरुण परीक्षेच्या पुढच्या टप्प्यावर यशस्वी होईलच, याची खात्री बाळगता येत नाही.

दुसरीकडे आता अपयशी ठरलेला विद्यार्थी पुढे यशाच्या शिखरावर पोचल्याचीही उदाहरणे आहेत. पण, अपयशाला सामोरे जाण्याची मानसिकता नसल्यामुळे केवळ भीतीने विद्यार्थी स्वत:ला हतबल समजतो. प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहतो. दुर्दैवाने समाजातील यशस्वी जीवनाची मोजपट्टी ही एखाच्या डॉक्टर, इंजिनिअर आणि कदाचित काही वेळा प्रशासकीय अधिकारी बनण्यात इतपत मर्यादित ठरू पाहात आहे.

पालकांच्या अपेक्षांमुळे जीवघेणी वाटतेय परीक्षा पद्धती

विद्यार्थी जीवनातील वाढत्या वयात उत्तम आहार, विहार, व्यायाम व शारीरिक कष्टाची पूरक गरज असते. याचे भान पालक गमावत आहेत. घोड्यांच्या शर्यतीत घोड्यांना नव्हे, तर त्यांना हाकणाऱ्या जॉकीला स्पर्धा जिंकण्यात फायदा दिसतो. त्याचप्रमाणे पालक आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी पाल्यांच्या मानसिक व शारीरिक निकोप वाढीकडे लक्ष न देता त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादत आहेत. काही पालक तर मुलांच्या अभ्यासाच्या तयारीसाठी वर्षभर नोकरी वा व्यवसायातून रजा घेतात. पालकांच्या या हट्टापुढे शरीर, मन व अभ्यासाने दुर्बल असणारा विद्यार्थी टिकू शकत नाही आणि परीक्षा पद्धती त्याला जीवघेणी वाटू लागते.

लीजंडपुढेही अपयश, तरी पोचले यशाच्या शिखरावर

अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर किंवा स्व. इंदिरा गांधी यांना भारतीय समाजमनात 'लीजंड' मानले जाते. त्यांनाही त्यांच्या जीवनात अपयश व दु:खाला सामोरे जावे लागले. त्यांनी धीर व संयमाच्या मदतीने त्यावर यशस्वी मात केली. जीवनातील वाईट क्षण अडथळा नसून व्यक्तिमत्त्वातील सुप्त गुण दाखविण्यासाठी संधी मानली, तर अपयशदेखील सकारात्मक वाटते. टोकाचा निर्णय घेऊन मनुष्य जीवनाची मिळालेली दैवी देणगी नाकारून सहजसुंदर व सुखी जीवन जगण्याची संधी गमावतो. यासाठी शिक्षक व पालकांनी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासासाठी पुढाकार घ्यावा.

संत तुकाराम महाराज म्हणतात...

‘ठेविले अनंते तैसेचि राहावे l चित्त असो द्यावे समाधान ll' या उक्तीप्रमाणे जो वागतो, त्याला आयुष्यच सार समजले असे मानावे. तो व्यक्ती सुखी जीवन व्यतीत करतो. शेवटी एवढंच, आयुष्यात समाधानी असणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती समाधानी आहे, त्यालाच सुख प्राप्ती होते. म्हणूनच आयुष्यात नेहमी समाधानी रहायला शिका असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी

विद्यार्थ्यांनी, पालकांनी आहे तो निकाल स्वीकारावा. अपेक्षेप्रमाणे आता यश मिळाले नाही म्हणून हताश न होता नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करावेत. पालकांनी मुलांवर दबाव किंवा अपेक्षा लादू नयेत. अपयशानंतरही यशाच्या शिखरावर पोचलेल्या व्यक्तींची उदाहरणे आपल्यासमोर आहेतच.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT