Threat call Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhandup : "पुरी ट्रेन पॅक होगी, इन्शाल्ला हम.." भांडुपच्या व्यक्तीला धमकीचा Message; दहशतवादी हल्ल्याच्या शंकेने खळबळ

Terrorism in Mumbai:गुरुवारी हा धमकीचा मेसेज आल्यानंतर तक्रारदाराने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली

सकाळ डिजिटल टीम

Attack message in Bhandup:भांडूपमधील एका व्यक्तीला धमकीचा संदेश आल्याने खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक निदर्शनातून हा संदेश दहशतवादी हल्ल्यासाठी असू शकतो याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या व्यक्तीला आलेल्या संदेशामधील मजकूर देखील संशय बळावणारा आहे.

संबंधित व्यक्तीला आलेल्या मेसेजमध्ये सांगण्यात आलाय की, "कल 9 बजे की प्लानिंग है, पुरी ट्रेन पॅक होगी, इन्शाल्ला हम हमारे मनसुबे मे मुकंमल होगे, खुदा फीस कल ट्रेन मे रश रहेगा और उसी दौरान काम को अंजाम देना, सब खैर्यत है यहा, काम होने पे मालगाडी मे मिलते है, दस के बाद सबके फोन बंद रहेंगे."असा हा धमकी वजा मेसेज होता.

या मेसेजवरुन लक्षात येते की ज्या व्यक्तीने हा संदेश पाठवला आहे, तो ट्रेनमध्ये हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे निदर्शनास येते.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात 505 (2)भादवी कलमांतर्गत कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT