PhD Examinatio sakal
महाराष्ट्र बातम्या

व्हिडिओ कॅमेरा उघडल्याशिवाय देता येणार नाही ‘पेट’! प्रत्येक 3 सेकंदाला परीक्षार्थींची इमेज रेकॉर्डिंग; 30 जुलैला एकाच दिवशी होईल परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘पीएच.डी.’च्या ४७४ जागांसाठी ३० जुलै रोजी ‘पेट’ घेतली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, परराज्यातील, परदेशातील विद्यार्थी देखील आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘पीएच.डी.’च्या ४७४ जागांसाठी ३० जुलै रोजी ‘पेट’ घेतली जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, परराज्यातील, परदेशातील विद्यार्थी देखील आहेत. दरम्यान, ‘पेट’ देताना कोणी काही गैरप्रकार केल्यास त्यास पुन्हा या विद्यापीठाच्या ‘पेट’मध्ये सहभागी होता येणार नाही. परीक्षेसाठी वेब बेस्‌ड पद्धतीचा अवलंब केला जाणार असून व्हिडिओ कॅमेरा उघडल्याशिवाय परीक्षार्थींना ही परीक्षा देता येणार नाही.

‘पीएच.डी’पूर्व ‘पेट’साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदा पहिल्यांदाच ‘वेब बेस्‌ड’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा अर्जदार विद्यार्थ्यांना कोठूनही देता येणार आहे. आतापर्यंत चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले असून अर्ज करण्याची मुदत आणखी सहा दिवस (२२ जुलैपर्यंत) आहे. दुसरी महत्त्वाची बाब विद्यापीठाने यंदा ‘पीएच.डी.’चा विषय समाजोपयोगी निवडावेत, असे आवाहन केले आहे.

तीन सत्रात होणार परीक्षा

विद्यापीठाची ‘पेट’ ३० जुलैला तीन सत्रात होणार आहे. सकाळच्या सत्रात एक विषयातून अर्ज करणाऱ्यांची परीक्षा होईल. त्यानंतर दुपार व सायंकाळच्या सत्रात दोन विषयातून ‘पेट’ देणाऱ्यांची परीक्षा होईल. दोन्ही विद्यार्थ्यांची एकाच दिवशी ‘पेट’ होईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ‘पेट’ देताना मोबाईल असो की संगणक, लॅपटॉप, त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू केल्याशिवाय परीक्षा देताच येणार नाही. दुसरीकडे परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांकडे संपूर्ण लक्ष असणार आहे. त्याची नजर दोन ते तीनवेळा इतरत्र फिरली किंवा परीक्षेवेळी त्याने इकडे-तिकडे पाहिल्यास त्याचा पेपर आपोआप सबमिट होणार आहे. परीक्षेवेळी त्याला एकाच संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवर दुसरी विंडो उघडता येणार नाही, तसे केल्यास ते सिस्टिमला समजणार आहे. त्यामुळे परीक्षा पारदर्शक होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

३० जुलैला तीन सत्रात होईल पेट

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेट’चे नियोजन केले असून परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होईल. ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना कोठूनही देता येणार आहे. आतापर्यंत जवळपास चार हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यात परराज्यातील, परदेशातील विद्यार्थी देखील आहेत. ३० जुलैला तीन सत्रात ‘पेट’ होईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT