Pimpri-Chinchwad Municipal Corporation sakal
महाराष्ट्र बातम्या

E-Governance : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड महापालिका अव्वल; मुंबई द्वितीय तर कोल्हापुर.....

राज्यातील महापालिकांच्या ‘ई-गव्हर्नन्स निर्देशांका’क पिंपरी-चिंचवड महापालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील महापालिकांच्या ‘ई-गव्हर्नन्स निर्देशांका’क पिंपरी-चिंचवड महापालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपासून करण्यात येत असलेल्या या सर्वेक्षणात अव्वल क्रमांकाची ‘हॅट्रिक’ त्यांनी साधली. मुंबई महापालिकेने द्वितीय तर कोल्हापूर महापालिकेने यंदा तृतीय क्रमांक पटकावला आहे.

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे महापालिकांच्या ‘ई-गव्हर्नन्स’च्या सद्यस्थितीबाबत अभ्यास करण्यासाठी हा निर्देशांक तयार करण्यात आला. या निर्देशांकाचे हे तिसरे वर्ष होते. यंदाच्या सर्वेक्षणात राज्यातील एकूण २७ महापालिकांचा विचार करण्यात आला, अशी माहिती प्रकल्पाच्या संचालक नेहा महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पावर महाजन यांच्यासह श्वेता शहा, प्रणव जाधव, गौरव देशपांडे, मनोज जोशी, तन्मय कानिटकर आदींनी काम केले.

महाजन म्हणाल्या, ‘या अहवालाच्या कामाला मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, पिपंरी-चिंचवड, अमरावती, मीरा-भाईंदर या महापालिकांकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या या अहवालांतून शहरांच्या ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये काय प्रगती व अधोगती झाली, याची माहिती नागरिकांना मिळू शकेल. हा निर्देशांक http://e-governance.info/ या संकेतस्थळावर सर्वांना बघता येईल, तसेच डाऊनलोड देखील करता येईल.’

निर्देशांकाचे निकष -

सेवा, पारदर्शकता, उपलब्धता

तपासण्यात आलेली माध्यमे -

अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप, सोशल मीडिया हँडल्स

गुणांकनाची पद्धत -

- गुणांकनासाठी बायनरी पद्धतीचा वापर

- एखादी सेवा उपलब्ध असल्यास १ गुण, नसल्यास ० गुण

- सर्व गुणांचे रुपांतर करून १० पैकी गुणांमध्ये क्रमवारी

लक्षवेधी निरीक्षणे -

- गतवर्षीच्या तुलनेत प्रगती, मात्र अद्यापही सुधारणेला बराच वाव

- कोल्हापूर महापालिकेची लक्षणीय प्रगती, १४ व्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप

- मोबाईल ॲप या निकषात आठ महापालिकांना शून्य गुण

- सोशल मिडियाच्या निकषावरही सात महापालिकांना शून्य गुण

- २७ पैकी १२ महापालिकांमध्ये ऑनलाईन आरटीआय प्रक्रियेची सोय उपलब्ध नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

SCROLL FOR NEXT