Nana Patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

मोदींनी असंवेदनशीलतेची हद्द पार केली; नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

लोकसभेत बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर मोदींनी गंभीर आरोप केले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसनं रेल्वेतून लोकांना युपी-बिहारला पाठवून तिकडे कोरोना पसरवला असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सोमवारी केला. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी असंवेदनशीलतेची हद्द पार केली असं पेटोले यांनी म्हटलं आहे. (PM Modi crossed line of insensitivity Reply Nana Patole due to Lok Sabha speech)

पटोले म्हणाले, "मोदींनी असंवेदनशीलतेची हद्द पार केली. ज्यावेळी जागतीक आरोग्य संघटनेनं मार्गदर्शक तत्वे सुचवली होती, त्याचं पालन मोदींनी केलं असतं तर देशावर ही वेळ आली नव्हती. ही चूक त्यांनी मान्य करावी. 'नमस्ते ट्रम्प'चं आयोजनं कोणी केलं? तबलिगी समाजाला जागतीक पातळीवरचं अधिवेशन कोणी घ्यायला लावलं? या दोन प्रश्नांची उत्तर मोदींनी द्यावीत"

किती वर्षे तुम्ही काँग्रेसला शिव्या देऊन सत्तेचा उपभोग घेणार आहात आणि देश विकणार आहात. याचं उत्तरही द्यावं. तुम्ही ज्या दिवशी लॉकडाऊन सुरु केला तेव्हा रेल्वे, विमान, बस सेवा सर्वकाही बंद केलं. त्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणीवेळी निर्माण झाली होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात काँग्रेसनं लोकांच्या कोरोना चाचण्या करुन त्यांना तिकीटं काढून देऊन रेल्वेतून त्यांच्या घरी पाठवलं. पण मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपचे प्रचारक म्हणून सातत्यानं वागत आहेत. त्याची झलक त्यांनी आज लोकसभेत दाखवून दिली. त्यांना जनतेची कुठलीही काळजी नाही असा पंतप्रधान देशानं आज पाहिला, अशा शब्दांतही पटोले यांनी मोदींवर शरसंधान साधलं.

महिनाभर परप्रांतियांजवळ काम नव्हतं. अशा वेळी माणुसकीच्या नात्यानं काँग्रेसनं त्यावेळी नातं निभावलं. रेल्वे त्यावेळी तुम्हीच चालू केली होती, त्या माध्यमातूनच लोकांना आपल्या गावी जायचं होतं. दुसऱ्या लाटेमध्ये तुम्ही विधानसभेचा प्रचार करताना प्रेतं पडत असताना काय करत होतात. हे सर्व लपवण्यासाठी मोदी या प्रकारे काँग्रेसवर आरोप करुन या सर्व पापापासून मुक्त होण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT