Latest Palghar News: "वाढवण " बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 30 ऑगस्ट ला पालघर येथे करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तसेच पालघर जिल्हा भाजप पुढे आव्हान ऊभे होते. सभेला गर्दी करण्यासाठी संपुर्ण प्रशासन कामाला लागले होते.
नागरीकांना गोळा करण्यासाठी एस टी महामंडळाच्या सुमारे 550 एस टी बस अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियमीत बस फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. बस फेर्या रद्द झाल्याने, मिळेल त्या वाहनाने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना हाल अपेष्टा भोगत प्रवास करावा लागला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी " वाढवण बंदराचे " भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण येथे न करता, पालघर येथेच करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या सभेला गर्दी करण्यासाठी जिल्ह्याचे संपुर्ण प्रशासन कामाला लागले होते. जिल्हाधिकार्यांपासुन ते गावपातळीवर च्या तलाठी आणि ग्रामसेवकांवर गर्दी जमवण्यासाठी जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.
त्यासाठी गावोगावी बस धाडण्यात आल्या होत्या. नागरीकांना खुष करण्यासाठी पालघर विभागातील 150 बसेस सह अन्य विभागातुन सुमारे 550 बस अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. या बस वेगवेगळ्या चार विभागातुन पालघर ला आणण्यात आल्याचे विभागीय कार्यालयातुन सांगण्यात आले आहे.
बहुतांश बसेस अधिग्रहीत केल्याने, लांब पल्ल्याच्या तसेच नजीकच्या बसफेर्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कार्यालयात पोहोचणार्या चाकरमानी, शाळा, महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. सर्व स्तरातील प्रवाशांना ईच्छीत स्थळी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने, दाटीवाटी करत प्रवास करावा लागला आहे. सरकार च्या लाडक्या बहिणींना ही हा त्रास सहन करावा लागला आहे.
पुर्वी पक्षीय सभा, मेळावे यांना गर्दी जमवण्यासाठी ट्रक, जीप, टमटम अथवा खाजगी बसेस चा वापर केला जात होता. मात्र, अलिकडच्या काळात राजकीय व्यवस्था बदलली, राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, सतांतरे झाली. त्यामुळे मतदारांच्या ही अपेक्षा वाढल्या. मतदारांना खुष करण्यासाठी तसेच सभांना गर्दी जमवण्यासाठी राजकारण्यांनाही जुना फाॅर्मुला बदलुन , एसटी बस चा नवा ट्रेंड आणावा लागला आहे. मात्र, हा नवा ट्रेंड सर्वसामान्य प्रवाशांना हानिकारक ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.