महाराष्ट्र बातम्या

PM Narendra Modi : ''महाराष्ट्राला जगाचं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य'', मुंबईत पंतप्रधानांनी सांगितलं राज्याचं भविष्य

संतोष कानडे

मुंबईः राज्यातल्या 30 हजार कोटींच्या विकासाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी मोदींची महाराष्ट्राची समृद्धी आणि भविष्यात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं उभं राहात असतानाच कौशल्य विकासाच्या योजना पूर्णत्वाला जाणार आहेत. मागच्या महिन्याभरापसून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे.. एनडीए सरकारच स्थिरता आणि स्थाईत्व देणारं सरकार आहे. तिसऱ्यांदा आमच्या सरकारने शपथ घेतल्यानंतर एनडीए सरकार तीनपट गतीने काम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, सशक्त वर्तमान आहे आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. इंडस्ट्री, अॅग्रिकल्चर, फायनान्स या सगळ्या पॉवर महाराष्ट्राकडे आहेत. महाराष्ट्राला जगातलं सगळ्या मोठं आर्थिक पॉवर बनवण्याचं माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेले किल्ले आहेत, कोकणातलं टूरिझम आहे, समुद्राच्या तळाचं मनमोहक दृष्ट आहे, सह्याद्रीच्या डोंगरावर फिरण्याची वेगळी अनुभूती आहे.. त्यामुळे महराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.

मोदी म्हणाले की, मुंबईमध्ये १० वर्षांपूर्वी आठ किलोमीटर मेट्रो रेल्वे झाली होती. आज मुंबई मेट्रो ८० किलोमीटरपर्यंत गेली आहे. पुढेही २०० किलोमीटरपर्यंतचं काम प्रगतीपथावर आहे. मागच्या दहा वर्षात महाराष्ट्रात नॅशनल हायवेची लांबी वाढून तीनपट झाली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट हा प्रगती आणि प्रकृतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठाणे ते बोरीवली रस्त्याचं कामही सुरु आहे.

''सध्या पंढरपूर वारीमध्ये लाखो वारकरी चालत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २०० किलोमीटर पूर्ण झाला आहे, संत तुकाराम पालखी मार्ग ११० किलोमिटपर्यंत पूर्ण होत आहेत. हे दोन्ही मार्ग लवकरच खुले होतील. सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पंढरीच्या विठुरायाला कोटी-कोटी नमन करतो.''

मोदी पुढे म्हणाले की, कनेक्टिव्ही इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शेती, उद्योग आणि पर्यटनाला लाभ होतोय. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जेव्हा चांगली कनेक्टिव्हिटी असते तेव्हा महिलांना सुरक्षा आणि सन्मान मिळत असतो. एनडीए सरकारचं काम गरीब, शेतकरी आणि नारी शक्ती आणि युवा शक्तीला सशक्त करतं. महाराष्ट्राचं सरकार याच कटिबद्धतेने काम करत आहे आणि काम करत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT