Latest Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. टिळक पुरस्कार मोदींना मिळाल्याने त्यांना लोकमान्यांचे आशीर्वाद आणि बळ मिळणार आहे, असं शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, लोकमान्य टिळक प्रखर देशभक्त होते. ब्रिटिशांनाही थरकाप उडवणारं लोकमान्यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला असल्याने त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी देशासाठी मोठं काम केलं, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. शरद पवारांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे.
''टिळक प्रतिष्ठान स्मारक ट्रस्टने नरेंद्र मोदींची निवड केली त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मोदीजी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते ठरलेले आहेत. लोकमान्यही जागतिक कीर्तिचे महापुरुष होते. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिली. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं. मोदींनीही देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर सबका साथ सबका विश्वास, हा नारा दिला.''
''म्हणूनच मोदींच्या कार्याची पोचपावती या सन्मानाने होतेय, याचा मला अभिमान आहे. फ्रान्स देशानेही मोदींचा सर्वोच्च सन्मान केला आहे. कुणी बॉस म्हणतंय तर कुणी पाय धरतंय, असा पंतप्रधान देशाने कधीही पाहिला नाही. त्यांच्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.''
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींचं कर्तृत्व मोठं आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षिदार होण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळते आहे, हे भाग्य आहे. मोदींच्या नेतृत्वात देशात सत्तास्थापन झाल्यानंतर अनेक जटील प्रश्न मोदींनी सोडवलेले आहेत. ते बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहेत. या पुरस्काराने त्यांना लोकमान्यांचं बळ, ताकद आणि आशीर्वाद मिळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.