Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

अवघ्या 19 वर्षाचा तरुण आधी अश्लील क्लिप्स बनवायचा अन् नंतर..; 22 महिला बनल्या शिकार

आतापर्यंत 22 महिलांना आपली शिकार बनवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत 22 महिलांना आपली शिकार बनवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.

मुंबई : आतापर्यंत 22 महिलांना (Women) आपली शिकार बनवणाऱ्या अवघ्या 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी (Mumbai Police) अटक केलीय. या तरुणानं शहरातील सुमारे दोन डझन महिलांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटचा गैरवापर केलाय. विशेष म्हणजे, तरुणानं इन्स्टाग्रामवरून (Instagram) महिलांचे फोटो काढून टाकले आहेत.

आरोपीनं आधी पॉर्न क्लिप बनवली आणि नंतर ती काढून टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करू लागला. खंडणी व लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी या तरुणाला अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फोटो काढून टाकण्यासाठी 500 ते 4000 रुपयांची मागणी करत होता. महिलांकडून पैसे उकळण्याची आरोपीची पद्धत अशी होती की, पैसे तातडीनं दिल्यास 500 रुपये आणि एक दिवस उशीर झाल्यास 1,000 रुपये घ्यायचा.

महिलांना पाठवायचा अश्लील क्लिप

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर 19 वर्षीय प्रशांत आदित्यला (Prashant Aditya) त्याच्या गुजरातमधील गांधीनगर (Gujarat Gandhinagar) येथील घरातून अटक करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत नापास झाल्यानंतर आरोपी मास्क बनवणाऱ्या कंपनीत (Mask Company) काम करू लागला. विशेष म्हणजे, आदित्य त्याच्या समाजातील महिलांनाच टार्गेट करत होता. 14 जुलैच्या सुमारास त्याच्या समाजातील किमान 22 महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या प्रकरणाबाबत अँटॉप हिल पोलिसांशी संपर्क साधला. आरोपीच्या या कृत्यामुळं म्हणजेच, अश्लील क्लिप पाठवल्या जात असल्यानं मानसिक छळ, भीती आणि छळ होत असल्याचं पीडितांनी पोलिसांना सांगितलं. पाठवलेल्या क्लिप बहुतेक 30 सेकंदांच्या होत्या, असंही महिलांनी पोलिसांना सांगितलं.

DP वर असणाऱ्या मुलांच्या फोटोवर लिहायचा 'RIP'

पोलिसांनी आरोपींविरुद्ध केलेल्या तपासात असं आढळून आलं की, ज्या महिलांनी त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर डीपी म्हणून वापरले होते, त्या फोटोवर तो 'RIP' लिहून महिलांना पाठवायचा. त्यामुळं महिलांमध्ये सुरक्षेबाबत घबराट पसरली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अंतर्गत महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ, खंडणी इत्यादी प्रकरणी एफआयआर नोंदवलाय. यासोबतच IT कायद्याचे कलम 67A (लैंगिक कृत्ये प्रसारित करण्यासाठीची शिक्षा इ.) देखील लागू करण्यात आलीय. या प्रकरणाच्या तपासासाठी एसीपी अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि डीसीपी संजय पाटील यांच्या देखरेखीखाली एक पथक नेमण्यात आलं होतं.

आरोपीनं केलं 49 महिलांना टार्गेट

महिलांची फसवणूक केल्याच्या या प्रकरणातील मुख्य तक्रारदार 40 वर्षीय महिला असून ती एका कंपनीत काम करते. वरिष्ठ निरीक्षक नासिर कमलपाशा कुलकर्णी म्हणाले, आदित्यनं अँटॉप हिल इथं 22 महिलांसह 49 महिलांना टार्गेट केल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, पुढील तपासानंतरच याची पुष्टी होईल. आदित्यनं पीडितांना पेमेंटसाठी पाठवलेला QR कोड गुजरातमधील एका ट्रॅव्हल एजन्सीचा असल्याचं तपासकर्त्यांना आढळून आलंय.

पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला केली अटक

पोलिस अधिकारी गौरीशंकर पाबळे आणि राहुल वाघ यांनी आदित्यचा इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता शोधला. त्यानंतर इतर आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे तपशील गोळा करून त्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. आम्ही त्याचा मोबाईल जप्त केला असून तो पुढील तपासासाठी पाठवण्यात येणार असल्याचं पाबळे यांनी सांगितलं. न्यायालयानं आरोपीला सध्या २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT