CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा पंतप्रधानांचा सोलापूर दौरा! मंगळवारच्या यशस्वी दौऱ्यानंतर अप्पर पोलिस महासंचालकांकडून सर्वांचेच कौतूक

रे नगर प्रकल्पाच्या लोकापर्णानंतर पंतप्रधान मोदी हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही सोलापूरला आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तिसऱ्यांदा सोलापुरात आले होते. तिन्हीवेळा पोलिसांनी त्यांचे दौरे यशस्वीपणे पार पाडले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) सोलापुरात आले होते. त्यांच्या दौऱ्यात कोणताही गैरप्रकार किंवा चूक होणार नाही, यादृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त नेमला होता. रंगभवन चौक, पंचकट्टा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळेवेढेकर इन्स्टिट्युटसमोर बॅरिकेटिंग लावून त्याठिकाणी स्वतंत्र अंमलदार नेमले होते. सकाळी १०पासून रस्त्यांवर व ११ नंतर सभेच्या ठिकाणी खडा पहारा देणाऱ्या पोलिसांनी पंतप्रधानांचा दौरा यशस्वी केला.

सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा दौरा होता. रे नगर प्रकल्पाच्या लोकापर्णानंतर पंतप्रधान मोदी हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही सोलापूरला आले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तिसऱ्यांदा सोलापुरात आले होते. तिन्हीवेळा पोलिसांनी त्यांचे दौरे यशस्वीपणे पार पाडले आहेत. पंतप्रधान सोलापूरला येणार असल्याने विमानतळ ते होम मैदान या रोडवर सकाळी दहा वाजल्यापासूनच पोलिस अंमलदार नेमले होते.

सभेच्या ठिकाणी ११ पासून अंमलदार होते. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण तैनात आहे की नाही, याची पाहणी उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे, डॉ. दिपाली काळे यांनी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनीही सर्व बंदोबस्ताची पाहणी केली. सभा संपल्यावर पंतप्रधानांना विमानतळापर्यंत पोच करण्यात आले.

दोन चपाती, शिरा जागेवरच खावून बंदोबस्त

छत्रपती संभाजी नगर विभागासह अन्य ठिकाणाहूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त मागविण्यात आला होता. जवळपास अडीचशे अधिकारी व कर्मचारी बाहेरील होते. याशिवाय सोलापूर शहरातील सातशे ते आठशे अंमलदार देखील बंदोबस्तासाठी नेमले होते. पंतप्रधान दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी एकूण १५० अधिकारी व ८०० अंमलदार होते. बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेच्या ठिकाणीच जागा मिळेल तेथे दोन चपात्या, भाजी व शिरा खावून बंदोबस्ताची ड्युटी यशस्वीपणे पार पाडल्याचे पहायला मिळाले.

वरिष्ठांनी बंदोबस्ताचे कौतूक केल्याचे समाधान

आमच्या सर्व पोलिस अधिकारी, अंमलदारांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने दोन दिवसांपासून खूप उत्कृष्ट मेहनत केली. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक दिपक पांडे यांनीही बंदोबस्ताचे कौतूक केल्याचे समाधान असून त्याचे संपूर्ण माझ्या सर्व अधिकाऱ्यांसह अंमलदारांना जाते. निवडणुकीच्या रणधुमाळीत दौरा यशस्वीपणे पार पाडल्याने सर्व सोलापूरकर व पोलिस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन व कौतूक आहे.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT