CP M. rajkumar esakal
महाराष्ट्र बातम्या

कुमक कमी, तरी पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ यशस्वी! सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभेची निवडणूक शांततेत; ८२८ बूथचे ४५ सेक्टर करून पोलिस आयुक्तांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन

लोकसभा निवडणूक, नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सण-उत्सव पार पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. शहर हद्दीत सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा ६० टक्के भाग येतो. एकूण ८२८ बुथसाठी २०१९ मध्ये १६५० स्थानिक बंदोबस्त, ११०० होमगार्ड व बाहेरील कंपन्या होत्या.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणूक, नवरात्र, गणेशोत्सव, दिवाळी हे सण-उत्सव पार पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली. शहर हद्दीत सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा ६० टक्के भाग येतो. एकूण ८२८ बुथसाठी २०१९ मध्ये १६५० स्थानिक बंदोबस्त, ११०० होमगार्ड व बाहेरील कंपन्या होत्या. पण, २०२४च्या निवडणुकीत ५०० होमगार्ड कमी, स्थानिक २०० अंमलदारांना बाहेर बंदोबस्त होता. तरीदेखील मतदान-मतमोजणी शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद ठरली.

विधानसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री पवन कल्याण यांची रॅली, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार असुदोद्दीन ओवेसी, हैदराबादच्या भाजप नेत्या माधवी लता या दिग्गजांच्या सभा सोलापूर शहरात पार पडल्या. सभा, रॅलीचा बंदोबस्त करूनही पोलिसांनी निवडणुकीच्या बंदोबस्ताची ड्यूटी देखील व्यवस्थित पार पाडली.

आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे, डॉ. दीपाली काळे यांनी मनुष्यबळ कमी असताना देखील निवडणूक बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. निवडणूक झाली, तरीदेखील रात्री १०नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असणारच आहे.

बंदोबस्ताचे असे मायक्रो प्लॅनिंग...

  • सुरवातीला शहरातील मतदारसंघातील ८२८ बूथचे तयार केले ४५ सेक्टर, १५ हून अधिक ड्रोनद्वारेही लक्ष

  • प्रत्येक सेक्टरसाठी एक पोलिस उपनिरीक्षक, चार अंमलदार, सायबर पोलिसांकडून सोशल मिडियावर वॉच

  • प्रत्येक चार सेक्टरसाठी एक पोलिस निरीक्षक, चार अंमलदार, क्राईम ब्रॅंच, गुप्ता वार्ताचीही पथके

  • एका मतदारसंघासाठी एक सहायक पोलिस आयुक्त व मदतीला एक दंगा नियंत्रक पथक

  • प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्त व त्यांच्यासोबत (क्युआरटी) शिघ्र प्रतिसाद पथक

  • पोलिस आयुक्तांकडून नियमित सर्व बंदोबस्तावरील देखरेख, नियोजनाची पाहणी

तब्बल २४ जण स्थानबद्ध तर ८० जण तडीपार

फेब्रुवारी ते २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तब्बल २४ जणांवर स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई करून त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविले. याशिवाय ८० जणांना तडीपार करण्यात आले. या कारवाईचा मोठा परिणाम झाला आणि शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांना आजपासून सुट्या, रजा

विधानसभा निवडणुकीमुळे १५ ते २५ नोव्हेंबर या काळातील पोलिसांच्या सुट्या, रजा बंद करण्यात आल्या होत्या. पोलिस महासंचालक कार्यालयाचे सर्वच जिल्ह्यांसाठी तसे आदेश होते. आता निवडणूक संपली असून सर्वकाही शांततेत पार पडले आहे. उद्यापासून (मंगळवार) पोलिसांना नेहमीप्रमाणे सुट्या, रजा घेता येणार आहेत.

सर्वांनीच कौतुकास्पद काम केले

विधानसभा निवडणुकीच्या पोलिस बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन करून प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. ड्रोनचही वापर केला. रात्री दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय झाला. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडली. सर्वांनीच कौतुकास्पद काम केले.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Mumbai Vada Pav: मुंबईचा 'वडापाव' खिशाला परवणारा नाही राहिला, इतका महाग झाला; पण, का अन् कसा?

IPL Auction: श्रेयस अय्यरला तर सोडलं, पण आता KKR चा कर्णधार कोण? रहाणे-डी कॉकचा पर्याय पण...

Vaibhav Suryavanshi : राजस्थानने 1.10cr मोजले, पण १३ वर्षीय खेळाडूला IPL 2025 खेळता येणार नाही? नियम काय सांगतो वाचा

SCROLL FOR NEXT