२००८ साली राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी काही भडकाऊ वक्तव्य केल्याचं समोर आलं होतं. (Raj Thackeray Hanuman Chalisa Row)
राज ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीच्या शिराळ्यात मनसेच्या कार्यतर्त्यांनीही आंदोलन केलं होतं. या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता. (Raj Thackeray News)
महिनाभरापूर्वी शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र महिनाभरापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या केसेस निकाली काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत.
त्यानुसार ही प्रकऱणं आतापर्यंत मार्गी लागणं आवश्यक होतं. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. त्याआधीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी 11 वाजता राज्याचे पोलीस माहसंचालक रजनीश सेठ आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक बोलावली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत गृहमंत्र्यांना माहिती देण्यात आल्याचं समोर येतंय. सध्या राज ठाकरे यांनी भोंगे आणि हनुमान चालिसेचा विषय उचलून धरला आहे.
यासाठी त्यांनी आज म्हणजेच ईदच्या दिवशी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. उद्यापासून भोंगे वाजताना दिसल्यास त्या ठिकाणी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.