political news CM Uddhav thackeray corona eknath shinde game changer of maharashtra politics mumbai Sakal
महाराष्ट्र बातम्या

संपर्क व मदत हेच गमक!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड यशस्वी करण्यात एकनाथ शिंदे तयार असून या यशस्वी बंडामागे शिवसेनेतील निष्ठावंत आमदारांशी शिंदे यांनी ठेवलेला सततचा संपर्क आणि वेळोवेळी दिलेला मदतीचा हात हेच खरे गमक असल्याचे समोर येत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोरोना काळात आमदारांशी तुटलेला संपर्क आणि त्यातून सुरू झालेल्या खदखदीला शिंदे यांनी पद्धतशीरपणे हाताळले होते. ग्रामीण भागातील आमदारांना नैसर्गिक आपत्ती असो की कोरोनाचा कठीण काळ, या काळात शिवसेना आमदारांसाठी एकनाथ शिंदे यांनी मोठा आधार दिला. अनेक आमदारांना मतदारसंघात कामे करण्यासाठी सर्वतोपरी रसद पुरवली.

पक्षाच्या आमदारांना आपलेसे करणारे आमदार एकनाथ शिंदे यांच्या शब्दाबाहेर नसल्याचा विश्वास पटल्यानंतर पक्षातून अंतर्गत गटबाजीला धुमारे फुटू लागले. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. मात्र त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबतचा असमन्वय नाराजीचे कारण होऊ लागले.राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना पक्षात न आल्याने उमेदवारी नाकारली. यावेळी शिंदे यांची भूमिका संभाजीराजे यांच्या बाजूने होती. राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र ठाकरे यांनी शिंदे यांना विधान परिषद निवडणुकीत थोडे बाजूला ठेवले. सामान्य आमदारांना जसा निरोप दिला जातो तसा साधा निरोप देत ‘ट्रायडन्ट’मधील बैठकीला बोलावले.

यावेळी शिंदे यांच्यावर अपेक्षित जबाबदारी दिली नसल्याने ते नाराज होते, असे सांगण्यात येते. या मतदानाच्या वेळी शिवसेना आमदारांना मतपत्रिका वाटप करतानाही खासदार अनिल देसाई आणि स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित होते. ये सर्व प्रकाराने शिंदे व्यथित झाल्याचे सांगण्यात येते. यादिवशीच त्यांनी सर्व आमदारांना ठरल्याप्रमाणे ठाणे येथे बोलावून थेट सुरतेची वाट धरल्याचे समजते.

शिंदे यांची जमा बाजू

  • नगरविकास विभागाच्या वतीने निधीचे मोठ्या प्रमाणात वाट

  • रायगड आणि कोल्हापूरच्या महापुराच्या वेळी कोट्यवधी रुपयांची साधनसामग्री व औषधांचा पुरवठा

  • मदतीचे वाटप करताना फारसा गाजावाजा नाही

  • मदतीमुळे आमदारांना स्थानिक पातळीवर काम करणे सोपे झाल्याने आमदारांमध्ये आदराची भावना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: काय सांगता! पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?

BookMyShow Crashed: भारतीय चाहत्यांमध्ये 'Coldplay'ची झिंग, तिकिट विक्रीपूर्वीच बुक माय शो क्रॅश

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदार यादी, इव्हीएम बॅलट युनिट पडताळणीसह केंद्रांची निश्चिती

Saptshringi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता 23, 25 व 26 सप्टेंबरला सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत बंद राहणार..

Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील अपघातांचा आलेख घसरला, नागपूर विभागात मृतांचीही संख्या निम्म्यावर

SCROLL FOR NEXT