Surekha Punekar
Surekha Punekar esakal
महाराष्ट्र

राष्ट्रवादीतच प्रवेश का? सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं 'कारण'

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : आजपर्यंत कलेची भरपूर सेवा केली आता गोरगरीब जनता, महिला आणि लोककलावंतांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास व तळमळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) निवड मी केली आहे. आज (ता. १६) माझा पक्ष प्रवेश होणार आहे. यामागे कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा व अपेक्षा नाही; पण भविष्यात पक्षाने एखादी जबाबदारी सोपविल्यास मी मागेही सरकणार नाही, असे सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Lavani Artist Surekha Punekar) यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

आजपर्यंत कलेची भरपूर सेवा केली आता गोरगरीब जनता, महिला आणि लोककलावंतांचे प्रश्न सोडवायचे आहेत.

वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधून पारावरचा तमाशा ते लावणी व टीव्ही शो-चित्रपट असा जिद्दीचा प्रवास केलेल्या पुणेकर आज चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक विभाग मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘लोककला सादरीकरणाच्या निमित्ताने छोट्याशा खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतचा आजवर खूप मोठा प्रवास झाला. गोरगरीब जनतेचे प्रश्न अडचणी जवळून पहिल्या, खूप वाटायचे त्यांच्या समस्या मांडाव्यात, सोडवून घ्याव्यात; परंतु केवळ भावनिक होऊन गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय ताकदही पाठीशी असायला हवी म्हणूनच मी राष्ट्रवादीची निवड केली आहे.

विकासाची नेमकी दृष्टी असलेला हा पक्ष असून, अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे ही गरीब, कष्टकरी जनता व कलावंतांच्या विकासाची तळमळ असलेली नेतेमंडळी आहेत. राजकारणात गेले तरी माझ्यातील कला व कलाकार थांबणार नाही. कार्यक्रम सुरूच आहेत व सुरूच राहतील. सध्या अनेक कलाकार राजकीय व कला क्षेत्रात कार्यरत आहेत, मीही त्याप्रमाणे योगदान देईन. कोरोनामुळे कला क्षेत्र खूप वाईट परिस्थितीतून निघालेले आहे. कलाकारांची अवस्था बिकट आहे. काहींनी मधल्या काळात जीवन संपवले. एक कमावता माणूस आणि घरात पाच-दहा खाणारी तोंडे अशी अनेक छोट्या कलाकारांची अवस्था आहे. कार्यक्रम बंद असल्याने काही जण भाजीपाला विकताहेत, धुणीभांडीही करताहेत. उपाशी मारण्यापेक्षा बाहेर कोरोनाने मेलेले बरे अशीही भावना कलाकार व्यक्त करताहेत. आता या राजकीय व्यासपीठाचा मला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगला उपयोग होईल.’’

माझ्या कलेचा चाहता वर्ग राज्यभर आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांचे मजबूत संघटन आणि सर्वसामान्य जनता व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य राहील.

-सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

ZIM vs IND 1st T20 Playing 11 : शुभमन गिल मित्राला संधी देणार; सीएसकेचा कर्णधार ऋतुराजला बसावं लागणार बेंचवर?

SCROLL FOR NEXT