Chief of National Parties in India Sakal
महाराष्ट्र बातम्या

Indian Politics Update : ९० चे देवगौडा, ८४ चे फारूक, ८२ चे शरद पवार; जाणून घ्या देशातल्या महत्त्वाच्या पक्षाच्या अध्यक्षांचं वय काय?

Indian Politicians Retirement Age : भारतीय राजकारणामध्ये निवृत्तीचं वय ठरलेलं नाही. जाणून घ्या देशातले राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षांचं वय...

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्रात सध्या काका पुतण्यांमध्ये चांगलेच वाद सुरू आहेत. यामध्ये आता बंडखोर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहेत. तसंच शरद पवारांना रिटायर होण्याचा सल्लाही दिला आहे. पण राजकारणात वय महत्त्वाचं नसतं असं म्हणत शरद पवारांनी पलटवार केला आहे.

साधारणपणे प्रत्येक नोकरीमध्ये व्यवसायामध्ये निवृत्तीचं एक वय असतं. पण भारतीय राजकारणामध्ये निवृत्तीचं वय ठरलेलं नाही. जाणून घ्या देशातले राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षांचं वय...

देशामध्ये ६ राष्ट्रीय पक्ष आहेत – भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी(मार्क्सवादी), आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी. देशात ५४ प्रादेशिक पक्ष असून २,५९७ मान्यता नसलेले पक्ष आहेत. नुकतंच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी(सीपीआय) या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे.

भारतीय जनता पार्टी (BJP)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आहेत. ते ६२ वर्षांचे आहेत. ते २०२० मध्ये भाजपाचे ११ वे अध्यक्ष झाले. पक्षामध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल तीन वर्षांचा असते. नड्डा यांना जानेवारी २०२३ मध्ये एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ते पक्षाची कमान सांभाळणार आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. काँग्रेसला या वर्षी २४ वर्षांनंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळाली आहे. १३७ वर्षे जुन्या असलेल्या काँग्रेस पक्षामध्ये सहाव्या वेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. खर्गे अध्यक्ष झाले तेव्हा २२ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रिया झाली होती.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची धुरा सध्या सीताराम येचुरी यांच्या खांद्यावर आहे. ते ७० वर्षांचे आहेत आणि एप्रिल २०१५ सालापासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत.

आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आहेत. ते ५४ वर्षांचे आहेत. या पक्षाची स्थापना २०१२ साली झाली. त्यानंतर १० च वर्षांत पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे.

बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आहेत. त्यांचं वय ६७ वर्षे आहेत. त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. मायावती पहिल्यांदा जून १९९५ मध्ये भाजपा आणि इतर पक्षांच्या समर्थनाने मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यांना आयएएस व्हायचं होतं. पण १९७७ मध्ये दलित नेते काशीराम यांची भेट झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

नॅशनल पीपल्स पार्टी

नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख कोनराड संगमा आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. पार्टीचा प्रभाव मुख्यत्वे मेघालय आणि आसपासच्या प्रदेशात आहे. पूर्वोत्तर भागातली ही एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे.

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी आहेत. त्या ६८ वर्षांच्या आहेत. ममता २०२१ साली पश्चिम बंगालच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी १५ व्या वर्षीच राजकारणात प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आहेत. ते ८२ वर्षांचे आहेत. काँग्रेसमधून वेगळं झाल्यापासून २५ वर्षे अगोदर शरद पवारांनी या पक्षाची स्थापना केली होती. पवार ५० पेक्षा अधिक वर्षांपासून जास्त काळ राजकारणात सक्रीय आहेत. ते वयाच्या ३२ व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. ४५ वर्षांपूर्वी शरद पवारांनीही बंड केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT