Jitesh Antapurkar Won Deglur Bypoll Election  esakal
महाराष्ट्र बातम्या

देगलूर-बिलोली पोटनिवडणूक : काँग्रेसकडून भाजपला धोबीपछाड, महाविकास आघाडीची सत्ता कायम

अंतापूरकर यांनी 41 हजार 933 एवढ्या मताने विजय मिळविला आहे.

भाग्यश्री राऊत, अनिल कदम

नांदेड : काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. अंतापूरकर यांनी 41 हजार 933 एवढ्या मताने विजय मिळविला आहे. देगलूर-बिलोली विधानसभेचे (Deglur Biloli Assembly Byelection Result 2021) आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यासाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले. आज मंगळवारी मतमोजणी झाली पार पडली. मतदारांनी आज कौल महाविकास आघाडीला दिला आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसने भाजपला धोबीपछाड करून सोडले.

Update :

  • २७ वी फेरी - काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयाच्या उंबरठ्यावर. त्यांना ३८ हजार १२६ मतांची आघाडी

  • २२ वी फेरी - फेरी अंती 32172 काँग्रेस आघाडीवर

    जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) - 3767

    सुभाष पिराजीराव साबणे (भाजप) - 1861

    डॉ उत्तम रामराव इंगोले (वंचित) - 335

  • 19 वी फेरी - अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर.

    जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) - 70675

    सुभाष पिराजीराव साबणे (भाजप) - 45452

    उत्तम रामराव इंगोले - (वंचित) - 7668

  • बारावी फेरी - अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

    काँग्रेस - जितेश अंतापूरकर - 44344

    भाजप - सुभाष साबणे - 30169

    वंचित बहुजन आघाडी : डॉ. उत्तम इंगोले - 4464

    ▪️श्री.अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

  • फेरी क्रमांक ९ - काँग्रेस आघाडी १०५८३ वर

    जितेश अंतपुरकर (काँग्रेस) - ३६९३

    सुभाष साबणे (भाजप) - २६१२

    डॉ. उत्तम इंगोले (वंचित) -३५४

  • आठवी फेरी - एकूण आठव्या फेरी अंती 9502 काँग्रेस आघाडीवर

    जितेश अंतापुरकर (काँग्रेस) - 3999

    सुभाष साबणे (भाजप) - 2709

    डॉ उत्तम इंगोले (वंचित) - 381

  • सातव्या फेरीत काँग्रेस 8212 मतांनी आघाडीवर, भाजपचे सुभाष साबने यांना १५ हजार १६३ मते मिळाली आहेत. जितेश अंतापुरकर (काँग्रेस) 3044, सुभाष साबणे (भाजप)

    2600, डॉ उत्तम इंगोले (वंचित) 449

  • ६ व्या फेरीअखेर काँग्रेसचे अंतापुरकर ७७६८ मतांनी आघाडीवर आहेत.

  • पाचव्या फेरी अखेर जितेश अंतापूरकर यांना ६१७० मतांची आघाडी घेतलेली आहे.

  • चौथी फेरी - काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर ४५५७ मतांनी आघाडीवर

  • जितेश अंतापूरकर (काँग्रेस - 14,544

  • सुभाष साबने (भाजप) - 9,975

  • उत्तम इंगोले (वंचित) - 1,225

  • तिसरी फेरी -

    जितेश अंतापूरकर (काँग्रेस - 4216 +3418

    सुभाष साबने (भाजप) - 2592+2447

    उत्तम इंगोले (वंचित) - 320+104

  • तिसऱ्या फेरीत अंतापूरकर 3264 मतांनी आघाडीवर आहेत.

  • दुसरी फेरी -

    दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार अंतापूरकर २२९३ मतांनी आघाडीवर आहेत.

    तिन्ही उमेदवारांना मिळालेली मते -

    जितेश अंतापूरकर (काँग्रेस) - 7294

    सुभाष साबने (भाजप) - 5001

    उत्तम इंगोले (वंचित) - 769

  • देगलूर पोटनिवडणुकीची पहिली फेरीतील मतमोजणी संपली असून यामध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना ४२१६ मते मिळाली आहेत, तर भाजपच्या सुभाष सबाने यांनी २५९२ मते मिळाली, तर वंचितच्या डॉ. उत्तम इंगोले यांना ३२० मतांवर समाधाना मानावे लागले. जितेश अंतापूरकर यांची या फेरीत १६२४ मतांनी आघाडीवर आहे.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत ३० ऑक्टोबरला ६४ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते.

काँग्रेस-भाजप प्रमुख लढत -

या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला म्हणजेच जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. सुभाष साबणे यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांना तगडी टक्कर दिली होती. पण, साबणे हे त्यावेळी शिवसेनेत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे ही पोटनिवणूक त्यांना लढायची होती. त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले नाही. कारण, महाविकास आघाडीने एकत्र ही निवडणूक लढविली. त्यामुळे सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांना तिकीट देखील मिळालं होतं. पण, साबणे यांना पराभव पत्करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT