Puja Khedkar news esakal
महाराष्ट्र बातम्या

Puja Khedkar : कोर्टाने जामीनअर्ज फेटाळताच पूजा खेडकर परदेशात पसार? पोलिसांचं पथक होणार रवाना

Pooja Khedkar fled abroad latest Marathi news : दिल्लीच्या पतियाला कोर्टाने त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

रोहित कणसे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. दिल्लीच्या पतियाला कोर्टाने त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र यापूर्वी पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताच खेडकर पसार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परदेशात रवाना होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवेगिरी आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपानंतर काही दिवसांपूर्वी ‘यूपीएससी’ने पूजा खेडकर हिची निवड रद्द केली आहे. यानंतर पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील पतियाळा हाऊस न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. खेडकर हिच्यावरील आरोपांचा तपास ‘यूपीएससी’ व लालबहादूर शास्त्री अकादमीकडून सुरु आहे.

अटक होण्याची शक्यता

पतियाळा हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर हिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पूजा खेडकर हिने बहुविकलांगता या प्रवर्गातून २०२२ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दिली होती. यावेळी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. इतकेच नाही तर कोट्यवधींची संपत्ती असताना आठ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवून नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र देखील सादर केलं. यासोबतच परीक्षा देण्याची मर्यादा संपलेली असताना नावात बदल करुन अनेकदा परीक्षा दिल्याचा प्रकार देखील समोर आला.

दरम्यान ही बनवेगिरी उघड झाल्यानंतर खेडकर विरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच स्वतःची बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पुजा खेडकर यांनी मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नाही. इतकेच नाही तर पुणे पोलिसांनी देखील देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT