Puja Khedkar news esakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar: 'उमेदवारी रद्द झाल्याचा आदेश मिळालाच नाही', पूजा खेडकरची हायकोर्टात धक्कादायक माहिती

UPSC: युपीएससीने 13 जुलै रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूजा खेडकरची उमेदावारी रद्द करण्याचा आणि तिला इथून पुढे युपीएससीच्या परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला होता.

आशुतोष मसगौंडे

माजी प्रशिक्षणार्थ आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. खेडकरच्या वकिलाने आज सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितले की, "यूपीएससीने माझी उमेदवारी रद्द केल्याबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र मिळाले नाही. पूजाला ही सर्व माहिती प्रसार माध्यमातूनच मिळाली आहे.

युपीएससीने उमेदावारी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाची हंगामी मुख्य न्यायाधीश मनमोह यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही सुनावणी झाली.

युपीएससीने 13 जुलै रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पूजा खेडकरची उमेदावारी रद्द करण्याचा आणि तिला इथून पुढे युपीएससीच्या परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला होता.

पूजा खेडकरने युपीएससीच्या परीक्षा देताना नावात बदल करणे, खोटी कागदपत्रे वापरणे आणि मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देणे यासारखे प्रकार केले होते. यामध्ये ती दोषी अढळल्यानंतर युपीएससीने कारवाई केली होती.

या प्रकरणाची सुनावणी वेळी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी पूजा खेडकरची बाजू मांडली. यावेळी जयसिंग यांनी प्रेस रीलिझचा संदर्भ देताना सांगितले की, “या प्रकरणातील विचित्र गोष्ट म्हणजे माझी उमेदवारी रद्द करण्याचा आदेश आजपर्यंत मला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांद्वारे दिलेला आदेश रद्द करत नवा आदेश द्यावा जेणेकरूण मला योग्य न्यायाधिकरणाकडे जाता येईल असे,” जयसिंग म्हणाल्या.

यावर युपीएससीने उच्च न्यायालयात सांगितले की, " ते पूजा खेडकरला दोन दिवसांत तिची उमेदवारी रद्द केल्याच आदेश देणार आहेत."

दरम्यान उच्च न्यायालयाने पूजा खेडकरवा उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी योग्य मंचाकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

पूजा खेडकरवरील आरोप

पूजा खेडकरवर आरोप आहे की, एक प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याला ज्या सुविधा नसतात अशा सुविधा तिने मागितल्या होत्या.

याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर कब्जा केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे.

पूजा खेडकरने तिच्या वैयक्तिक ऑडी कारमध्ये लाल दिवा आणि महाराष्ट्र सरकारच असे लिहिले प्लेट लावल्याचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. पुढे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर युपीएससी परीक्षा देताना पूजा खेडकरने गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT