Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दादागिरी कोणाची? अजित पवारांच्या एंट्रीमुळे चंद्रकांतदादांची होणार गोची..

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना-भाजप यांच्यासोबत सत्तेत समाविष्ट झाल्यानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर आता भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पदावर अजित पवार दावा ठोकण्याची शक्यता आहे.  (Marathi Tajya Batmya)

अजित पवार यापूर्वी पुणे जिल्ह्याचे तीनदा पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री बदलतील का असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. पुणे जिल्हा भाजपसाठी केवळ सत्ताकेंद्र म्हणून नाही तर विचारकेंद्र म्हणून महत्त्वाचा राहिला आहे.(Latest Marathi News)

अजित पवार यांच्यासोबतच्या भाजपच्या समीकरणांबद्दल यापूर्वीच्या शपथविधीनंतरही भाजपच्या विचार परिवारात अनेकदा टीका झाली होती. त्यामुळे सत्ता आणि विचार म्हणून महत्त्वाचे पुणे शहर परिवाराच्या मुशीतून वर आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहील की प्रशासनावर पकड असलेल्या अजित पवारांची तिथे वर्णी लागेल हा मुद्दा बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे. (Marathi Tajya Batmya)

तर सध्या पुण्याचे पालकमंत्रिपद भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. मात्र अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकल्यास भाजपच्या अडचणी आणखी वाढू शकतात. अशा परिस्थितीमध्ये भाजप काय निर्णय घेणार हे पहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलं सोनिया परचुरेंना पत्र; म्हणाले- ही पोकळी कधीही...

IND vs NZ: 99 OUT! ऋषभ पंतचे शतक हुकल्याची खंत; पण, सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं

Diwali Festival 2024 : टिकाऊ, इको- फ्रेंडली आकाशकंदीलांना मागणी! बाजारपेठ सजली; किमतींमध्ये दहा टक्के वाढ

"भाई, IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?" चाहत्याच्या प्रश्नावर Rohit Sharma चे भन्नाट उत्तर, Video Viral

Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य

SCROLL FOR NEXT