Prakash Ambedkar says We sympathise with Uddhav Thackeray over Shivsena mla disqualification result  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'हा निकाल फक्त औपचारिकता...'; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंबद्दल व्यक्त केली सहानुभूती

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे शिवसेनेचे दोन्ही गटांना पात्र ठरवलं आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविरोदात मानला जात असलेल्या या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

आमच्या युतीतील भागीदार शिवसेना -उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही सहानुभूती बाळगतो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही भारत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोर एक मजबूत केस उभी करण्यात अयशस्वी ठरली. ज्या दिवशी ECI ने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली त्याच दिवशी शिवसेना (UBT) लढत हरली होती. आज फक्त औपचारिकता होती! आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे, अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केली आहे.

राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्यानंतर आमचे मित्र उद्धव ठाकरे गट यांना धक्का बसला आहे. अपेक्षा केली होती की योग्य निर्णय होईल पण तो झाला नाही. आम्ही सहानुभूतीसह त्यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांची परिस्थिती समजू शकतो.

पण कायद्याबद्दल बोलायचे झाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मान्यता दिल्यानंतर ही फक्त औपचारिकता शिल्लक होती. राहुल नार्वेकरांनी इतका वेळ का घेतला माहिती नाही, ते लवकर देखील हा निकाल देऊ शकले असते. निर्णय हात अपेक्षित होता असे मी मानतो.

पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे हे जेव्हा सर्वोच्च न्यायालय मान्य करते, तेव्हा त्यांच्या गटाने केलेली कारवाई योग्य मानने यापेक्षा वेगळा पर्याय राहुल नार्वेकरांकडे नव्हता. त्यामुळे अशा वेळी राहुल नार्वेकरांनी पूर्वीच निकाल द्यायला हवा होता हे स्पष्ट झालं आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DM bought liquor: दारुची बाटली विकत घ्यायला स्वतः गेले कलेक्टर; दुकानदाराने लावला चुना

Gemini AI in Gmail :  ईमेलला उत्तर द्यायचंय! आता नो टेंशन; Gemini Gmail करणार सगळी मदत,वापरुन तर बघा

Latest Marathi News Live Updates : बिहार केडरमधील IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा

...म्हणून केदार शिंदेंनी बदलला 'बिग बॉस मराठी ५'चा होस्ट; कोहली-रोहितचं उदाहरण देत म्हणाले- महेशदादाबद्दल

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र 3 की ४ ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT