तेलंगणात 'बीआरएस'चा पराभव निश्चित असून त्यासंबंधीचा सर्व्हे समोर आला आहे. तरीसुद्धा 'बीआरएस' महाराष्ट्रात विशेषतः : सोलापुरात येऊन सत्तेचे स्वप्न पाहत आहे.
सोलापूर : भाजप व मोदी सरकारविरुद्ध (Narendra Modi) बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांचे तोंड बंद करण्याची गुजराती स्टाइल आता महाराष्ट्रातील लोकशाहीचा खून करीत आहे, अशी जोरदार टीका आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली.
शहराध्यक्ष चेतन नरोटेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर काँग्रेसतर्फे निदर्शने केली. आंदोलनावेळी आमदार शिंदे म्हणाल्या, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या झंझावतामुळे देश-परदेशात नेहमीच खोटे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाखालील वाळू सरकली आहे.
अनेक राज्यातील सत्ता जात असल्याने त्यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली असतानाही जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पंतप्रधानांना वेळ नाही. महाराष्ट्रात भाजपने अभद्र युती करून सत्तेसाठी लोकशाहीचा खून केला आहे.
लोकांचा कल बदलत असून हे सरकार फारकाळ टिकणार नाही. काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, सुशीला आबुटे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले.
तसेच नरसिंह आसादे, अॅड. मनीष गडदे, शहराध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, अल्पसंख्यांकचे शहराध्यक्ष जुबेर कुरेशी, वसीम पठाण, ब्लॉक उपस्थित होते. अध्यक्ष देविदास गायकवाड, वाहिद बिजापुरे, भीमाशंकर टेकाळे, हेमा चिंचोळकर, मकबूल मोहोळकर, राजन कामत, अंबादास गुत्तिकोंडा.
जेम्स जंगम, आशा म्हेत्रे, सुमन जाधव, अश्विनी जाधव, भारती इप्पलपल्ली, अरुणा वर्मा, तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, शोभा बोबे, हाजी मैनुद्दीन शेख, नीता बनसोडे, चंदा काळे, मुमताज शेख, हुस्नाबानो चंदीरकी, विजयालक्ष्मी झाकणे, करीम शेख, शकूर शेख, सुनीता बेरा, शनैश्वर आसादे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
राजकीय स्वार्थासाठी सोलापूर शहरात देखील षडयंत्र रचले गेले होते. पण सोलापूरची जनता त्यास बळी पडली नाही. आता तेलंगणात 'बीआरएस'चा पराभव निश्चित असून त्यासंबंधीचा सर्व्हे समोर आला आहे. तरीसुद्धा 'बीआरएस' महाराष्ट्रात विशेषतः : सोलापुरात येऊन सत्तेचे स्वप्न पाहत आहे.
त्यामागे कोण आहेत, हे जनतेने बघायला पाहिजे. बीआरएसने पहिले स्वतःचे घर सांभाळावे, मग महाराष्ट्रात किंवा सोलापूर शहरात सत्तेचे स्वप्न पाहावे, असा सल्लाही आमदार प्रणिती शिंदे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.