Prataprao gujar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prataprao Gujar : बहलोल खान शरण यावा म्हणून जत तालुक्यातील नदीच अडवली; असा होता प्रतापरावांचा पराक्रम!

प्रतापरावांनी खानाला अंगाची लाही-लाही करून तडपवला...

सकाळ डिजिटल टीम

तो काळ ई.स.१६४७ चा होता. अवघं स्वराज्य शिवराज्याभिषेकात न्हाऊन निघालं होतं. कारण, त्या साली महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला होता. त्या दरम्यान प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सेनापती बनले होते.

याचवेळी बहलोल खान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता, रयतेचा छळ करत होता. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते.  शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना खानाला यमसदनी पाठवण्याचा आदेश दिला. तो आदेश घेऊन सोबत केवळ सहा मावळे घेऊन ते खानाच्या मागे निघाले. त्यांच्यासोबत आनंदराव, सिद्धी हिलाल, व त्याचे पाच पुत्र विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, बल्लाळ, सिदोजी निंबाळकर, रूपाजी भोसले, सोमाजी मोहिते, महादजी ठाकूर आणि दीपाजी राऊत होते.

खान तेव्हा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या उमराणीत होता. त्याच्यासोबत भाई खान, तारा पांढरे नाईक, खराडे नाईक व सिद्धी मोहम्मद होते. प्रतापरावांनी त्वरीत कूच करून बहलोल खानाला उमराणी पाशीच गाठले. मराठे अगदी जवळ येऊन ठेपले आहेत याचा बहलोल खानाला काही थांगपत्ताच नव्हता.

जत तालुक्यातल्या उमराणी गावी जी नदी आहे. तिच्या काठावरच खानाचा तळ होता. कारण, सैन्याला लागणारा पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात होता. कारण ते एप्रिलचे दिवस होते. कडक उन्हाळ्यात बहलोल खान नदी सोडून जाण्याचा विचारही करू शकत नव्हता. कडक उन्हामूळे नदीही आटली होती. नदी पात्रात ठोकळ ठोकळ ठिकाणी असलेल्या खड्ड्यातच पाणी शिल्लक होते. याचाच फायदा घेत प्रतापरावांनी योजना आखली.

एका रात्री प्रतापरावांच्या सैन्याने पुढे येऊन या पाण्याच्या साठ्यांना वेडा घातला. सकाळ झाली व सर्वप्रथम शस्त्रांसह सज्ज असलेल्या सैनिकांबरोबर खानाचे हत्ती पाण्याकडे येऊ लागले. त्यांची नजर पाठवठ्या शेजारी उभ्या असलेल्या शत्रूकडे गेली. शत्रुने भेटलेला संकट असल्याच्या आरोळ्या उठल्या. खानाचे लष्कर सज्ज झाले आणि पाणवठ्याच्या दिशेने शस्त्र घेऊन सरसावले.

पानवठ्यापाशी प्रतापराव स्वतः उभे होते. त्यांनी खानाच्या आघाडीवर हजार घोडे स्वरांसह हल्ला चढवला. पाण्याचा कडेकोट बंदोबस्त त्यांनी करून ठेवला होता. या दिशेने युद्धाला तोंड फुटले तोच आनंदरावांनी बहलोल खानाच्या पिछाडीवर हल्ला चढवला. विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव यांनी एका बाजूने तर भिमाजीसह महाजित ठाकूर यांनी दुसऱ्या अंगाने हल्ला चढवला.

शत्रूच्या हल्ल्यात आनंदराव जखमी झाले होते. बहलोल खानाच्या सैन्यात हत्ती होते. यातला एक हत्ती उन्मत्त झाला आणि स्वतःची साखळी सोंडेत करून तो धावत सुटला. बहलोल खानाच्या सेनेत एकच गोंधळ उडाला माहुताने कसातरी त्या हत्तीला आवडला. परंतु मराठे त्याच्यावर तुटून पडले आणि शेवटी सिद्धोजी निंबाळकरांनी तो हत्ती पकडून आणला.

सिद्धी मोहम्मद बरकीने बाण मारून दीपाजी राऊतरावांचा घोडा मारला. दीपाजींनी दुसरा घोडा घेतला तर या घोड्याच्या बगलेवर पाठीवर व तोंडावर तलवारीचे वार बसले. त्यामुळे तो निकामी झाला. एवढ्यात दीपाजींनी बर्कीच्या डोक्याखाली खांद्याजवळ जिथे चिलखत नव्हते. त्याठिकाणी तलवारीचा जोरदार वार केला.

ती म्हणजे त्याच्या शिबंदीकडचा पाण्याचा साठा संपला होता. पठाण सैनिक आणि घोडे पाण्यासाठी तळमळत होते. समोर पाणी होते परंतु ते मराठ्यांच्या ताब्यात होते. आता खान कासावीस झाला. पळूनही जाता येईना कारण मराठ्यांनी चारही बाजूंनी घेरलेले होते. आता शरणागती शिवाय सुटका नाही.

हे त्यांनी ओळखले आणि त्याचा वकील प्रतापरावांकडे पाठवला. त्याचा वकील प्रतापरावांसमोर येऊन नम्रपणे दिनमाने भाषेत बहलोल खानाच्या सुटकेची विनवणी करू लागला. मराठ्यांच्या कचाट्यात अडकलेला हा पठाणी सरदार अगदी शेळी मेंढी सारखा गरीब होऊन दयायाचना करत होता.

आम्ही शिवाजी राजांच्या वाटेत पुन्हा कधीही येणार नाही. आम्हाला जीवनदान द्यावे. अशी विनवणी करू लागला. सरसेनापती प्रतापराव गुजर त्यांच्या या दिनवान्या शब्दांनी खानाची आणि त्यांच्या सैन्याची दया आली. एवढी शिक्षा पुरे झाली असे म्हणून प्रताप प्रमाणे खानाला सोडून दिले.

या गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराज नाराज झाले. त्यांनी फर्मान सोडले की बहलोल खानाचा वध केल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. शिवाजी राजांना देव मानणाऱ्या मावळ्यासाठी हा आदेश म्हणजे देहदंडापेक्षाही मोठी शिक्षा. त्यामूळे ती शिक्षा संपवण्यासाठी प्रतापरावांनी बहलोल खानाला नेसरीत गाठले आणि तिथेच त्याला आडवा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT