Prataprao Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prataprao Pawar: शेती मध्ये AI आणण्याची कल्पना कशी सुचली? बिल गेट्स फाउंडेशनचं सेंटर बारामतीमध्ये कसं सुरू झालं

Prataprao Pawar: राजकारणात येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही वेगळं काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगत बिजनेसमध्ये शिक्षण घेऊन मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या प्रतापराव पवारांनी 'सकाळ' च्या 'आमच्या काळी' या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगितले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Prataprao Pawar: राजकारणात येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही वेगळं काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगत बिजनेसमध्ये शिक्षण घेऊन मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या प्रतापराव पवारांनी 'सकाळ' च्या 'आमच्या काळी' या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रवासाविषयी सांगितले. त्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय, बिट्स पिलानीमध्ये जाऊन शिक्षण घेणं, त्यावेळी बिजनेस उभारण्यासाठी लागणारी मेहनत येणाऱ्या अडचणी, कुटूंबाचा प्रतिसाद, बारामतीत उभारला बिल गेट्स फाऊंडेशन सोबतचा AI Based Project इथंपासून ते त्यांच्या आत्ताच्या फिटनेसबाबत त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

'आमच्या काळी' या पॉडकास्टमध्ये बोलताना प्रतापराव पवारांनी AI च्या आधारावर शेतीवर केलेल्या प्रयोगाबाबत बोलताना बारामतीत बिल गेट्स फाऊंडेशन सोबतचा AI Based Project कसा उभा राहिला. त्याचे काय फायदे आहेत याबाबातची माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डॉ. जावकरांची ओळख झाली. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामध्ये जागतिक तज्ज्ञ आहेत. त्यांना वर्षातून एकदा व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं जातं. प्रतापराव पवारांचा प्रयत्न होता की त्यांना एकदा COEP येथे बोलवावं. मात्र, त्यांना शेतीत जास्त आवड आहे, आणि त्यांना त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था, चांगलं मनुष्यबळ, चांगले स्त्रोत, अनुभव, डाटा असणारी संस्था हवी आहे, असं डॉ. जावकरांनी प्रतापराव पवारांना सांगितलं. तेव्हा प्रतापराव म्हणाले, माझ्या गावात अशा एक संस्था आहे.

त्यानंतर त्यांना फोनवरून सर्व माहिती दिली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. जावकर म्हणाले आम्हाला शिकवाल का? त्यानंतर प्रतापराव पवार जावकरांना बारामतीला घेऊन गेले. त्यानंतर जावकर म्हणाले आपण ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीसोबत ग्लोबल अ‍ॅग्रीमेंट सही करुया.

अशातच बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनचे म्हणणे होते की, जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शेतीकरता वापरला गेला पाहिजे. तेव्हा बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने वॉशिंग्टनमध्ये शेतीसंबधी एक सेंटर काढलं होतं. त्यानंतर त्यांना जेव्हा कळलं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बारामतीशी शेती संबधित अ‍ॅग्रीमेंट केलं आहे तेव्हा त्यांनी एक माणूस पाठवला. त्यांनी भेट घेतली चर्चा केली आणि सांगितलं की, वॉशिंग्टननंतर शेतीसंबधीचं जगातील दुसरं सेंटर बारामती असेल. त्यांनी आपलं सेंटर दिलं. त्यानंतर आम्ही अनेक गोष्टींवर रिसर्च करू शकलो, असं प्रतापराव बोलताना म्हणाले.

मायक्रोसॉफ्ट कंपनी, बिल गेट्स फाऊंडेशनचे लोक, बारामतीचे लोक यांनी मिळून गेली २ ते ३ वर्षे यासंबधी रिसर्च केले. त्यातून जे तंत्रज्ञान यशस्वी झालं आहे, गेल्या महिन्यात त्याचं उद्धाटन झालं, त्यामुळे एका एकरामागे निदान ४० टक्के शेतीचे उत्पन्न वाढेल, १५ ते २० टक्के खर्च कमी होईल, शेती पिके मजबूत असतील, शेती पिकं सेंद्रीय असतील त्यामुळे त्यांना युरोपियन मार्केट खुलं होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT