maharashtra vidhansabha election dates esakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा निवडणुकीची तयारी! ‘ईव्हीएम’ सिलबंद; आता निवडणूक निर्णय अधिकारी प्रशिक्षणासाठी पुण्यात; शिक्षकांसह २२ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. ५ हजार ‘ईव्हीएम’ गोडावूनमध्ये सिलबंद करून ठेवल्या आहेत. आता प्रशिक्षणाचा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे १५ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तीन हजार ७२३ मतदान केंद्रांसाठी लागणाऱ्या सर्वच ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. पाच हजार ‘ईव्हीएम’ आता गोडावूनमध्ये सिलबंद करून ठेवण्यात आल्या आहेत. आता प्रशिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यातील ४४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे १५ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू झाले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, यादृष्टीने २६ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन होणे जरूरी आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता जाहीर होऊन दिवाळीनंतर (३ नोव्हेंबरंनतर) मतदान शक्य आहे. पण, निवडणूक आयोगाकडून अद्याप राज्यातील विधानसभेच्या कार्यक्रमाची प्रतीक्षाच आहे. तत्पूर्वी, मतदान यादी अंतिम करण्यात आली आहे. याशिवाय ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी देखील पूर्ण करण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी (उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी, तहसीलदार) यांचे पुण्यात प्रशिक्षण सुरू आहे. १ ते १५ सप्टेंबर या काळात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करून त्यांचेही प्रशिक्षण होणार आहे.

जिल्ह्यात २२ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात यंदा तीन हजार ७२३ मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरी भागात एक हजार १७७ तर ग्रामीण भागात दोन हजार ५४६ केंद्रे आहेत. त्या केंद्रांवर निवडणुकीवेळी काम करण्यासाठी जिल्ह्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी असणार आहे. त्यात प्रामुख्याने शिक्षण विभागाकडील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक, महसूल, जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय विभागांकडील कर्मचारी देखील असणार आहेत. त्यांची माहिती सध्या संकलित करून ऑनलाइन भरली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

विधानसभेच्या अंतिम मतदार यादीत ३७ लाखांवर मतदार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्व ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायचे आहे, पण नावनोंदणी केली नाही अशांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस अगोदरपर्यंत नोंद करता येते. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ३७ लाख ६३ हजार ७८९ मतदार आहेत.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT