Teacher Bharti esakal
महाराष्ट्र बातम्या

Teacher Bharti: प्राथमिक शिक्षक भरती बारा वर्षांपासून नाहीच; अठरा हजार जागा रिक्त, बंदी उठून देखील कार्यवाही नाही

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती तब्बल बारा वर्षांपासून झालीच नाही. आधी भरतीवर असलेली बंदी तर, ही बंदी उठल्यानंतर संचमान्यताच निश्‍चित न झाल्याने, अद्याप शिक्षकांची ही भरती प्रक्रिया सुरु होऊ शकलेली नाही.

यामुळे आजघडीला मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या १८ हजार ४९ जागा अद्याप रिक्तच आहेत. एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील १६ हजार ७४८ जागा आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पावणे दोनशेहून अधिक रिक्त जागांचा समावेश आहे.

एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचावण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शिक्षकांच्या जागा भरल्याच जाणार नसतील तर, राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

म्हणून भरतीवर बंदी होती...

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. याच नियमाच्या आधारानुसार सध्या १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत.

२०११ मध्ये काही खासगी शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शिक्षक भरतीवरच बंदी घालण्यात आली होती.

राज्यातील केवळ प्राथमिक शिक्षकांच्याच नव्हे तर, शिक्षण विभागातील अगदी वरिष्ठ पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंतच्या हजारो जागा रिक्त आहेत.

यामध्ये अगदी सचिवांपासून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. यामुळे या रिक्त जागांनी शिक्षण विभाग अगदी खिळखिळा झाला आहे. त्यातच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांकडे ११७ प्रकारची अशैक्षणिक कामे सोपविण्यात आलेली आहेत. या बाबी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठा अडथळा ठरू लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील केवळ शिक्षकच नव्हे तर, सर्व प्रकारच्या रिक्त जागा त्वरित भरणे गरजेचे आहे.

- गौतम कांबळे,

राज्य अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अशी आहे स्थिती

तत्कालीन महायुती सरकारने २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्यावेळी पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली.

यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या.

प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील एक हजार ३०१ जागांचा समावेश.

कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे रिक्तच. यामध्ये नगरपालिका, महापालिका, खासगी अनुदानित शाळा आदी शाळांमधील रिक्त जागांचा समावेश नाही

नेमके काय झाले?

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ मध्ये घातलेली बंदी २०१९ मध्ये उठविली.

परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही.

सध्या रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांमध्ये राज्यात सर्वाधिक एक हजार १९६ जागा या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील आहेत.

सर्वांत कमी म्हणजेच केवळ ८७ जागा या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT