मुंबई : तुमची इच्छा आहे तर शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यास तयार आहे. याआधी तुम्ही २४ तासांच्या आत मुंबईत या. तिथून पत्रव्यवहार किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू नका. तुमच्या मागणीवर नक्की विचार केला जाईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. यावर बोलताना शिवसेना भाजपसोबत जाणार का, असा प्रश्न काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला तर आश्चर्य वाटेल, असेही चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. (Prithviraj Chavan said, it would be a surprise if the Chief Minister took a U-turn in 24 hours)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुरतला गेलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख या आमदारांना घेऊन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही आपण कसे सुटलो आणि घडलेला प्रसंग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितला. यानंतर संजय राऊत यांनी वरील भाष्य केले.
शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यास तयार आहे तर ते भाजपसोबत जाणार आहे का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यात ते काहीही बोलले नाही. आता त्यांनी दबावाखाली भूमिका घेतली आहे का? सत्तेसाठी मुख्यमंत्री दुय्यम भूमिका घ्यायला तयार आहेत का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ते काहीही बोलले नाही. यामुळे संजय राऊत आज जे काही बोलले आहे ते उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे की दुसऱ्यांची हे विचार करण्यासारखे आहे. शिवसेना कोणाकडे आहे हेच स्पष्ट होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री यू टर्न घेणार नाही असे वाटते. मात्र, २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला आश्चर्य वाटेल, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.