Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

'मोदी सरकारला घालवण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच'

राजेंद्र वाघ

'महाराष्ट्रातील काही पक्ष राज्यांपुरते मर्यादित प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळं सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत यायला हवं.'

कोरेगाव : तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत (Koregaon Nagar Panchayat Election) करण्याचा निर्णय माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झाला. कोरेगावच्या विकासासाठी काँग्रेसकडे (Congress) नगरपंचायतीची एकहाती सत्ता द्या, विकासकामांच्या निधीसाठी नगरविकास विभागाकडे तुमची वकिली करायला मी तयार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे केले.

महागाईविरोधात आंदोलन, काँग्रेसच्या तालुका कार्यालयाचे उद्‍घाटन, पक्षाच्या तालुका कार्यकारिणीचे पदग्रहण व धनंजय बर्गे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत येथे झाला. त्या वेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदीप जाधव, अजित चिखलीकर, ॲड. विजयराव कणसे, जाकीर पठाण, बाबासाहेब कदम, मनोज तपासे, राजेंद्र शेलार, तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण, मनोहर बर्गे, धनंजय बर्गे, जगन्नाथ कुंभार, सुनील भोसले, अविनाश फाळके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेसने प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक हातात घेऊन विजय संपादन करा. मतभेद विसरून ज्येष्ठांचा सल्ला घ्या, युवकांची फळी निर्माण करा, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’’ बूथ समित्या स्थापन करून तळागाळापर्यंत पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्या व शासकीय समित्यांवरील नियुक्त्या लवकरच होणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Prithviraj Chavan

तालुकाध्यक्ष अॅड. चव्हाण म्हणाले, ‘‘दोन आमदारांच्या विरोधात मला या ठिकाणी काँग्रेसच्या संघटना बांधणीची संधी मिळाली आहे. त्यासाठी मी पक्षातील ज्येष्ठांसह सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यरत राहीन.’’ मनोहर बर्गे म्हणाले, ‘‘दोन्ही आमदार स्थानिक नाहीत. त्यांना कोरेगावच्या समस्यांची जाण नाही. स्थानिक कार्यकर्तेच शहरातील समस्यांची तड लावू शकतात. त्यासाठी मी व धनंजय बर्गे शहरातील कार्यकर्त्यांच्या साथीने व पृथ्वीराजबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत.’’ या वेळी डॉ. जाधव, श्री. चिखलीकर, अॅड. कणसे, नाजीम इनामदार यांची भाषणे झाली.

मोदी सरकारवर हल्लाबोल

भाववाढ नव्हे, तर मोदी सरकारने करवाढ केल्याने महागाईचा भडका उडाला आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाकडे कार्यक्रम आहे, मनुष्यबळ आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेसच मोदी सरकारला (Modi Government) घालवू शकतो. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, तसेच केजरीवाल आणि महाराष्ट्रातील काही पक्ष राज्यांपुरते मर्यादित प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत यायला हवे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT