Priyanka Gandhi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Priyanka Gandhi: "पंतप्रधान प्रचाराला आले की, लहान मुलासारखे रडतात," प्रियंका गांधींचा नंदुरबारमध्ये हल्लाबोल

PM Modi: 50 वर्षांहून अधिक काळ येते काँग्रसचा खासदार निवडून येत आहे. पण गेल्या दोन निवडणुकीत भाजपने ही जागा काँग्रेसने हिसकावली आहे.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील जागांवरील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यानिमित्त काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज नंदूरबार येथे गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणता मी एकटा भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. त्यामुळे हे लोक मला शिव्या देतात. जेव्हा जेव्हा प्रचारासाठी येतात आणि बोलतात तेव्हा तेव्हा ते लहान मुलांसारखे रडता.

यावेळी प्रियंका यांनी देशातील अनेक मुद्यांवर बोलत पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला.(Priyanka Gandhi Nandurbar Rally)

पुढे प्रियंका म्हणाल्या की, काँग्रेस कायम जनतेच्या सेवेचा आणि विकासाचा विचार करते. तर दुसरीकडे भाजप पूर्णपणे विरोधी विचार करते. ते तुमच्या संस्कृती विरोधात वागतात. जेव्हा जेव्हा आदिवासींवर आत्याचार होतो, तेव्हा तेव्हा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बडे बडे नेते गप्प राहतात.

पुढे प्रियंका म्हणाल्या, मणिपूरमध्ये महिलांवर खूप अत्याचार झाला. एका महिलेला निवस्त्र करत सर्वांसमोर आणले तरीही पंतप्रधान गप्पच होते. त्यांनी हे रोखण्यासाठी एक शब्दही काढला नाही.

तुमच्या संस्कृतीवर ते सतत हल्ले करत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारांवर बोलता तेव्हा तेव्हा तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. हेमंत सोरेन देशातील एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहेत. आणि झारखंडमध्ये निवडणुका सुरू असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तुमच्या संस्कृती आणि समाजावर भाजप आणि आरएसएस सतत हल्ला करत आहे, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला.

दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नंदुरबारमध्ये यंदा काँग्रेसने गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्यासमोर भापच्या डॉ. हिना गावित यांचे आव्हान असणार आहे.

50 वर्षांहून अधिक काळ येते काँग्रसचा खासदार निवडून येत आहे. पण गेल्या दोन निवडणुकीत भाजपने ही जागा काँग्रेसने हिसकावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT