Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: केंद्राकडून महाराष्ट्रात हिरे अन् दागिन्यांच्या उत्पादनासाठी ८२ कोटी रुपये; फडणवीसांची विधानसभेत माहिती

विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सुरत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच हिऱ्यांचे उत्पादन होत असल्याचे सांगितले.

Sandip Kapde

Devendra Fadnavis: मुंबईतील हिरे उद्योग सुरतला पळविण्यात आला नाही. तेथे फक्त उत्पादन होणार आहे. याउलट केंद्र सरकारने मुंबई येथे अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सुरत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच हिऱ्यांचे उत्पादन होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातून हिऱ्यांची देशविदेशात निर्यात केली जाते. गुजरातमध्ये एकाही उद्योग येथून गेला नाही.

उलट केंद्राने महाराष्ट्रात हिरे आणि दागिन्यांच्या उत्पादनासाठी ८२ कोटी रुपये दिले आहेत. २० एकर जागेवर जगातील सर्वांत अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क विकसित केला जाणार आहे. इटली आणि तुर्की या देशांपेक्षा अधिक सोयीसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मलबार गोल्ड नावाच्या कंपनीने मुंबईत १७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. ‘तुर्की डायमंड टुर्स’ ही कंपनीसुद्धा मुंबईत येणार आहे.

‘मविआ’ने गोठवला होता उद्योग-

मुंबईतून हिरे व दागिन्यांची निर्यात होत होती. विदेशात निर्यातीकरिता सर्व कागदपत्रे येथेच तयार केली जात होती. मात्र, महाविकास आघाडीने कोरोनाचे कारण देऊन हा उद्योग आठ महिने बंद ठेवला होता. वारंवार सूचना देऊन व सांगूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. येथे उत्पादन होत नाही फक्त कागदपत्रे तयार केली जातात याकडेही त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, कोणी ऐकले नाही. त्यामुळे निर्यातीत मोठी घट झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे. ९७.१३ टक्के निर्यात मुंबईत होत आहे. नव्या पार्कमुळे मुंबई हिरे व दागिन्यांचे जागतिक हब होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

‘एनसीबी’चा अहवाल नीट वाचा-

राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत आहे. कोणत्याही गुन्ह्यात वाढ झालेली नाही. याची आकडेवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. ‘एनसीआरबी’च्या अहवालात गुन्ह्यांच्या संख्येपुढे लोकसंख्येचा उल्लेख केला जातो. तो लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांची आकडेवारी बघितल्यास महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये नाही. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांचे माझ्यावरचे आणि नागपूरचे प्रेम जरा जास्तच वाढले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे सातत्याने आरोप केले जात असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT