Prominent Lawyer Shrikant Shivade Passes Away e sakal
महाराष्ट्र बातम्या

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फौजदारी खटल्यात निष्णांत वकील म्हणून नावाजलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (ता. १९) सकाळी निधन झाले. ते वय ६४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

वांद्रे येथील हीट अँड रन प्रकरणात अ‍ॅड. शिवदे यांनी अभिनेता सलमान खानची बाजू मांडली होती. कुख्यात गुंड छोटा शकीलला मदत केल्याप्रकरणी हिरे व्यापारी भरत शहा यांच्याविरुद्ध दाखल असलेला खटला ॲड. शिवदे यांनी लढविला होता. तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणात त्यांनी भांडारकर यांचा बचाव केला होता. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते.

ॲड. शिवदे यांनी इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी १९८५ पासून प्रॅक्टिस सुरू केली. अ‍ॅड. शिवदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आपला वकिली व्यवसाय सुरू केला. खासदार वंदना चव्हाण, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. विराज काकडे, अ‍ॅड. विजय सावंत यांच्यासमवेत यांनी एकत्रित काम केले. ते पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील होते. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात अ‍ॅड. शिवदे यांनी डीएसके यांच्या वतीने कामकाज पाहिले.

ॲड. शिवदे यांनी बचाव पक्षाकडून चालवलेली काही महत्त्वाची प्रकरणे

  • अभिनेता सलमान खान हीट अँड रन प्रकरण

  • शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी

  • कुख्यात गुंड छोटा शकीलला मदत केल्याप्रकरणी हिरे व्यापारी भरत शहा यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा

  • दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणात दाखल गुन्हा

  • बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल खटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT