Social media Sakal
महाराष्ट्र बातम्या

प्रचार थांबला, आता सायबर पोलिसांचे व्हॉट्‌सॲप ग्रूपसह सोशल मीडियावर लक्ष! सोलापूर, माढा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 7000 पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरात ७९८ तर ग्रामीण भागात दोन हजार ८१९ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात व्हावी म्हणून तमिळनाडूसह महाराष्ट्रातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त सोलापुरात दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरात ७९८ तर ग्रामीण भागात दोन हजार ८१९ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात व्हावी म्हणून तमिळनाडूसह महाराष्ट्रातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त सोलापुरात दाखल झाला आहे. मतदानाच्या दिवशी ७ मे रोजी सोलापूर शहर-जिल्ह्यात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, आता प्रचार संपला असून पुढील दोन दिवस सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांकडील सायबर पोलिस आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवून आहेत. शहर पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांची टिम त्यासाठी नेमली आहे. त्यांच्याकडून दररोज राजकीय, धार्मिक ग्रुप, वैयक्तिक ग्रुप व ॲक्टिव्ह कार्यकर्त्यावर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत जवळपास ४० ते ४५ जणांची माहिती सोलापूर शहर सायबर पोलिसांनी संबंधित पोलिस ठाण्यांना दिली आहे. एकमेकांविरुद्ध वैयक्तिक टीका, फोटो मॉर्फ करून प्रचार करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनीही सायबर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे.

सोलापूर शहरातील बंदोबस्त

  • एकूण मतदान केंद्रे : ७९८

  • स्थानिक पोलिस बंदोबस्त : १२००

  • बाहेरील अधिकारी- कर्मचारी : ४६०

  • बीएसएफ, एसआरपीएफ, आरपीएफ तुकड्या :

  • होमगार्ड : १०५०

  • अंदाजे एकूण बंदोबस्त : २,८००

---------------------------------------------------------------------

सोलापूर ग्रामीण पोलिस बंदोबस्त

  • एकूण मतदान केंद्रे : २८१९

  • स्थानिक पोलिस बंदोबस्त : १४००

  • एकूण अधिकारी : १९६

  • बीएसएफ, एसआरपीएफ, आरपीएफ तुकड्या : ८

  • होमगार्ड : २,४००

  • अंदाजे एकूण बंदोबस्त : ४,३००

व्हॉट्‌सॲप ग्रुपवर दररोज लक्ष

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता थंडावला असून ७ मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, सोशल मिडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर व पैसे, मद्य वाटप अशा बाबींवरही सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके देखील जिल्हाभर फिरत असून नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी देखील केली जात आहे. दरम्यान, सोलापूर शहर- ग्रामीणमधील राजकीय व धार्मिक व्हाट्‌सॲप ग्रुपसह फेसबुक, इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह मेसेजवर पोलिसांचा कटाक्ष आहे. कोडवर्ड तथा सांकेतिक भाषेत काही मेसेज व्हायरल होत असल्यास त्यासंबंधीची पडताळणी देखील सायबर पोलिस करीत आहेत.

सोशल मिडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र टिम

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता सोशल मिडियाच्या माध्यमातून पैसे वाटप अशा काही अवैध कृती होतात का, प्रचार संपला असताना कोणी सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करतोय का, नेत्यांवर वैयक्तिक टिकाटिप्पणी, फोटो मॉर्फ करणे, अशा बाबींवर सायबर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून त्यासाठी स्वतंत्र टिम नेमली आहे.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT