2350 crore in central budget for Nagpur division for railways sakal
महाराष्ट्र बातम्या

Central Railway : खूशखबर! रेल्वे बोर्डाकडं पाठवला सिकंदराबाद-कोल्हापूर गाडीचा प्रस्ताव, प्रवाशांना होणार फायदा

कोल्हापूर-सिकंदराबाद ऐवजी कोल्हापूर-हैदराबाद गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे बोर्डाला पाठविलेल्या प्रस्तावात कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, कलबुर्गी, वाडी आणि सिकंदराबाद स्थानकावर थांबा देण्यात आल्याचा उल्लेख आहे.

मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून (Central Railway Pune Division) सिकंदराबाद-कोल्हापूर ही उन्हाळी स्पेशल साप्ताहिक गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र गाडीस पंढरपूर, सोलापूर, गाणगापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना थांबा न देत ठेगा दाखविण्यात आला आहे.

‘मध्य रेल्वे’च्या पुणे विभागाने रेल्वे बोर्डाला पाठविलेल्या प्रस्तावात कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, कलबुर्गी, वाडी आणि सिकंदराबाद स्थानकावर थांबा देण्यात आल्याचा उल्लेख आहे. हे थांबे मोटरमन आणि सुरक्षारक्षक बदलण्यासाठीच आहेत. सिकंदराबाद गाडीचा फायदा सांगली, कोल्हापूर येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

मात्र पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या प्रमुख तीर्थक्षेत्रांना गाडी थांबणार नसल्यामुळे तिला म्हणावा तितका प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे प्रवासी संघटनांचे मत आहे. कोल्हापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस (Kolhapur-Secunderabad Express) ही उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, जूनमध्ये शालेय सत्र सुरू झाल्यानंतरच धावणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे.

कोल्हापूर-सिकंदराबाद ऐवजी कोल्हापूर-हैदराबाद गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे. सिकंदराबाद गाडी मुळात एप्रिल, मे मध्ये सुरू करणे अपेक्षित होते. जूनमध्ये गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असला तरी कोल्हापूर-सिकंदराबाद वगळता मुख्य चार स्थानकांवर गाडीस थांबे देण्यात आले आहेत.

Central Railway Pune Division

२४ बोगींची गाडी जूनमध्ये चार फेऱ्यांमध्ये कोल्हापूर-सिकंदराबाददरम्यान धावणार आहे. याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र प्रस्तावित थांब्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रतिसादही कमी मिळणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करावा, अशी प्रवासी संघाची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

Deolali Assembly Constituency : देवळालीच्या वाढीव टक्क्याचा लाभार्थीचा फैसला शनिवारी

SCROLL FOR NEXT