sukanya samriddhi yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

दरमहा १२,५०० भरा अन्‌ २१व्या वर्षी ६४ लाख मिळवा; ‘सुकन्या’मुळे सर्वसामान्यांच्या कुटुंबात समृद्धी

मुलींचे शिक्षण, आरोग्य व विवाहासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मोठी मदत होत आहे. पालकांची देखील मुलींबद्दलची चिंता दूर झाली आहे. सुकन्या समृद्धी योजनेने मुला-मुलींमधील भेदभावाची दरी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : देशातील सर्वसामान्य कुटुंबांना मुलगी ओझे वाटू नये, मुलींचा जन्मदर वाढावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना २२ जानेवारी, २०१५ रोजी सुरू केली. त्यास ‘पंतप्रधान सुकन्या योजना’ देखील म्हणतात. टपाल ऑफिस किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये या योजनेतून खाते उघडता येते. आयकर भरणाऱ्यांना वार्षिक गुंतवणूक केलेल्या दीड लाखांवर ८० क-अंतर्गत आयकरात सूट मिळते. मुलींचे शिक्षण, आरोग्य व विवाहासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मोठी मदत होत आहे. पालकांची देखील मुलींबद्दलची चिंता दूर झाली आहे. सुकन्या समृद्धी योजनेने मुला-मुलींमधील भेदभावाची दरी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘या’ बाबी आवर्जून लक्षात ठेवाच...

  • दहापेक्षा कमी वय असलेल्या प्रत्येक मुलीला ‘सुकन्या’चे खाते उघडता येईल

  • तेथून १५ वर्षे सलग भरत राहायचे आणि शेवटची सहा वर्षे पैसे न भरता थांबायचे

  • महिन्याला किमान २५० रुपये भरू शकता, ‘सुकन्या’चा व्याजदर इतर योजनांच्या तुलनेत सर्वाधिक आहे

  • मुलीच्या वयाच्या १८व्या वर्षी शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी ५० टक्के रक्कम काढू शकतो

  • मुलीच्या विवाहापर्यंतच योजनेचा लाभ घेता येतो म्हणून विवाहावेळी सर्वच रक्कम काढता येते

  • वर्षभर खाते बंद राहिल्यास ५० रुपये दंड भरून पुन्हा सुरू करता येते; दोन मुलींना लाभ घेता येतो

‘सुकन्या’चे खाते उघडण्यासाठी...

  • मुलीचा जन्मदाखला

  • आधार कार्ड

  • आई-वडिलांपैकी एकाचा आधार, पॅनकार्ड व दोन फोटो

  • खाते उघडताना २५० रुपये भरावे लागतील

पद्मशाली फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी

पूर्व भागातील पद्मशाली इंटरनॅशनल फाउंडेशन, सोलापूर ईस्ट क्लबच्या वतीने महिला दिनी विडी कामगार महिलांच्या ५० मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेतून खाते उघडून दिले. त्यासाठी हरिदास पेंटा, गौरीशंकर दिकोंडा, नीलकंठ दोरनाल व श्रीरंग रेगोटी यांनी पुढाकार घेतला होता. हातावरील पोट असलेल्या असंख्य कुटुंबांतील महिलांना योजनेची काहीच माहिती नाही. त्यांच्यापर्यंत ही योजना पोचायला हवी; जेणेकरून मुलींचा जन्मदर पुरुषांच्या बरोबरीने होईल, असा विश्वास जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी व्यक्त केला आहे.

कसा मिळतो लाभ? जाणून घ्या

सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा साडेबारा हजार रुपये भरल्यास १५ वर्षांत तुमची रक्कम एकूण २२ लाख ५० हजार रुपये होते. त्यावरील व्याज आणि मुद्दल असे एकूण ६३ लाख ७९ हजार ६३५ रुपये त्या मुलीला वयाच्या २१व्या वर्षी मिळतील. दुसरीकडे, दरमहा अडीचशे रुपये भरल्यास २१व्या वर्षी एक लाख २७ हजारांपर्यंत रक्कम मिळते. विशेष बाब म्हणजे, मुलगी जन्मल्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडल्यास सलग १५ वर्षे पैसे भरावे लागतात आणि पुढील सहा वर्षे काहीच पैसे भरायचे नाहीत. मुलीच्या वयाच्या २१व्या वर्षी तेवढी संपूर्ण रक्कम मिळते. दुसरीकडे, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के रक्कम (शिक्षण व आरोग्यासाठी) काढता येते.

‘सुकन्या’ची राज्याची सद्य:स्थिती...

  • एकूण अंदाजित खाती

  • १.६३ कोटी

  • दरमहा गुंतवायची किमान रक्कम

  • २५०

  • वार्षिक अधिकाधिक गुंतवणूक

  • १.५० लाख

  • पैसे भरण्याचा कालावधी

  • १५ वर्षे

  • मुद्दल व व्याज मिळते

  • २१व्या वर्षी

सकळांसी येथे आहे अधिकार । भेदाभेद भ्रम अमंगळ...

सृष्टीवरील सर्व जीव एकाच ईश्वराचा अंश आहे. त्यांच्यात भेद करणे हे अमंगळ (अशुभ) आहे. सर्वांना समान अधिकार असून त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘यारे यारे लहान थोर । याते भलती नारी नर ।। सकळांसी येथे आहे अधिकार । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT