Pomegranate In Maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

Pomegranate In Maharashtra : अभिमानास्पद : या व्यक्तीने सोलापुरात उभारला महाराष्ट्रातील पहिला डाळिंब प्रक्रिया उद्योग !

Pomegranate In Maharashtra : कार्वी शेतकरी उत्पादक कंपनीची चार उत्पादने व संशोधन

सकाळ डिजिटल टीम

Pomegranate In Maharashtra : जीआय मानांकन मिळालेल्या सोलापूरच्या डाळिंबावर प्रक्रिया उद्योगातून चार उत्पादनांची निर्मिती करण्याबरोबरच डाळिंबाच्या उपयुक्ततेवर संशोधन करत कार्वी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मदन कुलकर्णी यांनी डाळिंब उत्पादकांच्या प्रगतीसाठी केलेली धडपड लक्षणीय ठरली आहे.

मदन कुलकर्णी हे सिव्हिल इंजिनिअर असल्याने त्यांनी एका इमारतीच्या बांधकामासाठी एमआयडीसीत प्लॉट खरेदी केला. काम संपल्यानंतर एमआयडीसीने त्यांना प्लॉटवर उत्पादननिर्मिती करा किंवा प्लॉट परत द्या अशी सूचना केली. मदन कुलकर्णी यांनी उद्योगात उतरण्याचा अवघड निर्णय धाडसीपणाने घेतला.

त्यांनी सोलापूरच्या जीआय मानांकन डाळिंबावर काम करण्याचे ठर.विले त्यांनी अभ्यास सुरु केला तेव्हा आश्चर्याचे धक्के बसले. भारतात फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रमाण फक्त पाच टक्केच आहे. तर युरोपियन देशात हे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय योग्य असल्याची जाणीव झाली. त्यांनी कार्वी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कामाला सुरवात केली.

सुरवातीला त्यांनी डाळिंबाचे दाणे वेगळे करून त्याचे पॅकिंग बाजारात आणले. नंतर त्यांनी डाळिंबाचा ज्यूस उत्पादित केला. बाजारती ज्यूस हे प्रिझर्व्हेटीव व रसायने वापरून केली जातात. त्यांनी हा ज्यूस नैसर्गिक ठेवून ‘फ्रोझन’ पद्धतीने टिकवण्याची पध्दत विकसित केली. हा ज्यूस विक्री करताना अनेक पुण्या-मुंबईच्या नामवंत हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी या ज्युसचे वैद्यकीय महत्त्व समजून घेत खरेदी करण्यात सुरवात केली. आता काही हॉस्पिटलकडून डाळिंबाच्या ज्युसचा रुग्णाच्या उपचारावर होणारा परिणाम यावर या वैद्यकीय संशोधन सुरु केले आहे.

सध्या स्थितीत पुण्यात महिन्याला दहा हजार ज्यूस पाऊच विक्रीस जातात. या टप्यानंतर त्यांनी डाळिंबाच्या वाळलेल्या दाण्यावर काम सुरु केले. तेव्हा हे वाळलेले दाणे मुखवासासाठी वापरले जाऊ शकतात यावर त्यांनी काम सुरु केले. डाळिंबाच्या तेलाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधनात केला जातो. त्याचीदेखील विक्री केली जाते. उरलेल्या सालपासून खतनिर्मितीसाठी त्यांनी संशोधनात्मक प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

ठळक बाबी

- कार्वी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

- डाळिंबापासून ताजे दाणे, तेल, ज्यूस, वाळलेल्या दाणे विक्री

- सालीपासून खत निर्मितीवर संशोधन सुरु

- हॉस्पिटलसमवेत डाळिंबाच्या ज्यूसच्या वैद्यकीय उपयोगावर संशोधन करार

- १५ जणांना प्रत्यक्ष व ७० जणांना अप्रत्यक्ष रोजगार

स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये..

- फळप्रक्रियेतील सर्व घटकांचा उपयोग होण्यासाठी संशोधन

- उत्पादनाच्या समवेत विक्री व्यवस्थापनासाठी संशोधनात्मक प्रयत्न

- बाजारातील नियमित उत्पादनापेक्षा वेगळी उत्पादने घेण्याचे पेलले आव्हान

- उद्योगातील कच्च्या मालाचा पूर्ण उपयोग करण्याचे प्रयत्न

डाळिंब उत्पादकांचा फायदा

डाळिंबाच्या झाडाला ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची डाळिंबे कमी लागतात. ३०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या लहान डाळिंबाला भाव मिळत नाही. ही लहान आकाराची व कमी वजनाची डाळिंबे विकत घेऊन उत्पादकांना चांगला भाव दिला जातो.

बीईंग सोलापूरकर म्हणून डाळिंब हे सुपरफ्रुट आहे, हे सिध्द करण्यासाठी हा प्रक्रिया उद्योग सुरु केला. कारण सोलापूरच्या डाळिंबाला जीआय मानांकन आहे. तर त्यावर प्रक्रिया करुन समाजात त्याची उपयुक्तता पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- मदन कुलकर्णी, सीईओ, कार्वी शेतकरी उत्पादक कंपनी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT