Pune Bypoll Election Mukta Tilak And Laxman Jagtap Kasaba Peth Chinchwad  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Bypoll Election : ...तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात आज पोटनिवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune Bypoll Election 2023: महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. दरम्यान, कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते असं मोठं विधान ॲड. असीम सरोदे यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Pune Bypoll Election Mukta Tilak And Laxman Jagtap Kasaba Peth Chinchwad )

भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण ७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

या दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. आज सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे देखील आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.

दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले सरोदे?

२६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. पण, त्यापूर्वी १४ फेब्रुवारीपासून शिवसेनेत बंडखोरी केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे.

१६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निकाल लवकर लागला तर कसबा आणि चिंचवडची निवडणूक रद्द होऊ शकते का? असं विचारलं असता असीम समोर म्हणाले, “भारतीय संविधानातील कलम १७२ नुसार विधानसभेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.

राज्यात २०१९ साली १४ वी विधानसभा अस्तित्वात आली. पण, शिवसेनेत फूट होऊन नवीन सरकार स्थापन झालं. त्याप्रकरणाचे कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंग आहेत, ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आले. यावर १४, १५ आणि १६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत निकाल येऊ शकतो.”

सर्वोच्च न्यायालयाने १४ किंवा १५ तारखेला निकाल देत महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त केली; अथवा हे सरकार चुकीचं आहे, असा निर्णय दिला. तर, राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशावेळी कलम १७२ नुसार विधानसभा टिकत नाही. त्यामुळे विधानसभा विसर्जित झाल्याने निवडणुकांचं आयोजन होऊ शकत नाही. त्यासाठी मतदानही केलं जाऊ शकत नाही.

काहीचं मत आहे की, निवडणूक जाहीर झाल्याने ती प्रक्रिया कोणाला थांबवता येत नाही, असं नाही. १४ तारखेला विधानसभा बरखास्त झाली, तर कोणत्याही प्रकारे निवडणुकांचं आयोजन होणं शक्य नाही. त्यामुळे कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूकही होऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT