राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो. यादरम्यान काँग्रेसच्या एका आमदाराने या पदासाठी दावेदारी सादर केली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवरा यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. यानंतर शरद पवार गटाने विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली.
दरम्यान अजित पवार गटाचा दावाआहे की त्यांच्याकडे पक्षातील जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांनी जवळपास ४० आमदार त्यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. यानंतर विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने अद्याप या पदावर दावा सांगितलेला नसला तरी पक्षातील एका आमदाराने हे पद आपल्याला मिळावे अशी मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधीपक्ष नेतेपद त्यांना मिळावं अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना याबद्दल पत्र देखील लिहीले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या नावाचा विचार करण्यात यावा याबद्दल आग्रह केला आहे.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर हे पद देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालं होतं, मात्र अजित पवार यांनी विरोध केला होता. आता ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाहीयेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण लक्षात घेऊन मला संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांनी स्वतःचा बायोडेटा देखील काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे.
महाराष्ट्र विधानसभेत ऐकूण २८६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपकडे सर्वात अधिक १०५ आमदार आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. सरकारला इतरही २० आमदारांचं समर्थन आहे. तर अजित पवार यांच्यासोबत आतापर्यंत २४ आमदार गेले आहेत. त्यामुळे सत्तापक्षाकडे आतापर्यंत १८९ आमदारांचं समर्थन आहे.
तर विरोधकांबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ४४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे फक्त १५ आमदार उरले आहेत. तर शरद पवार गटाकडे १४ आमदार शिल्लक आहेत. राष्ट्रवादीच्या १५ आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.