Maharashtra Politics Sports Entertainment Marathi News Update: आज सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यासह देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील कोरगाव पार्कमधील हिट अँड रन ते विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला दिलेल्या सहा सूचनांचा समावेश आहे.
आज राजकारणाशिवाय मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आम्ही सुरू केले आहे, सकाळ बुलेटीन... वाचा सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी...
पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. कोरेगाव पार्क परिसरात भरधाव आलिशान कारने दुचाकीस्वाराला उडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आला आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, मुंबईत गुरुवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही हवामानाच्या स्थितीत बदल दिसून येत आहेत, आणि पुढील काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.
गायक जोहेब हसन यांनी नुकत्याच त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करून त्यांच्या चाहत्यांना भावूक केले आहे. हसन यांनी टाटांच्या साधेपणाबद्दल, त्यांच्या नम्रतेबद्दल आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये टाटांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल खास आठवणी जागवल्या आहेत.
देशभरात सोन्या-चांदीच्या भावात बदल दिसून येत आहे. भारतात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची चांगली संधी आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 70,250 रुपये होती. एकूणच कालच्या तुलनेत आज भाव कमी झाले आहेत.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.
गुरुवारी मोठ्या चढ-उतारांदरम्यान भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीत राहिले आणि निफ्टी 25,000 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 144.31 अंकांनी अर्थात 0.18 टक्क्यांनी वाढून 81,611.41 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 16.50 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी वाढून 24,998.50 वर बंद झाला.
शारदीय नवरात्रीत महाअष्टमीला खुप महत्व असते. नवरात्रीत ९ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. अष्टमीला लहान मुलींना देवी मानून अन्नदान करतात. हा दिवस सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा करतात. आज मुलींना अन्न दान केल्यास माता गौरी प्रसन्न होते. यामुळे कोणत्या पदार्थांचा प्रसादात समावेश करावा हे जाणून घेऊया.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.
भारतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाला आजपासून (११ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही मोसमात अर्ध्याहून अधिक मोसमात भारतातील प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे; मात्र श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना भारतीय क्रिकेट संघात पुन्हा प्रवेश करण्यासाठी रणजी करंडकात चमक दाखवावीच लागणार आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अनेक दिग्गज अष्टपैलू खेळाडू झाले आहेत, ज्यांनी मोठे विक्रमही नावावर केले. आता या अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याचेही नाव घेतलं जात आहे. आयपीएलमधून प्रकाशझोतात आलेल्या हार्दिक पांड्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठई इथं क्लिक करा.
छोट्या पडद्यावर तीन मराठी वाहिन्यांमध्ये मुख्यतः टीआरपीची शर्यत दिसून येते. स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्या आणि या वाहिन्यांवरच्या कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिले जातात. त्यात टीआरपी यादीत स्टार प्रवाह वाहिनी सगळ्यात वर आहे. मात्र गेल्या २ महिन्यात टीआरपी यादीत बरेच बदल दिसून आले. कलर्स मराठी वाहिनीने चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.